मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरलं अफगाणिस्तान; लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी

बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरलं अफगाणिस्तान; लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी

तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी ट्विट केलं की, उत्तर अफगाणिस्तानातील कुंदुझ येथील मशिदीत झालेल्या स्फोटात लहान मुलांसह ३३ जण ठार झाले आहेत. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate
काबुल 23 एप्रिल : अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्यावेळी मशिदीत झालेल्या स्फोटात (Blast in Mosque) 33 जण ठार तर 43 जखमी झाले (33 Killed in Blast at Afghanistan). तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. इस्लामिक स्टेट गटाने दोन वेगवेगळ्या प्राणघातक हल्ल्यांचा दावा केल्याच्या एका दिवसानंतर हा स्फोट झाला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी ट्विट केलं की, उत्तर अफगाणिस्तानातील कुंदुझ येथील मशिदीत झालेल्या स्फोटात लहान मुलांसह ३३ जण ठार झाले आहेत. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो. युक्रेन हल्ल्यात आतापर्यंत 13414 रशियन सैनिकांचा मृत्यू, वाचा युद्धाचे 10 अपडेट या स्फोटाचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या मोहम्मद इसाहने सांगितलं की, मशिदीतील स्फोटानंतरचं दृश्य अतिशय भयानक होतं. मशिदीमध्ये नमाज पढणारे सर्व लोक एकतर जखमी झाले किंवा ठार झाले. या स्फोटांची जबाबदारी कोणीही तात्काळ स्वीकारली नसली तरी अफगाणिस्तानच्या इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या एका संघटनेने गुरुवारी अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया मुस्लिमांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा दावा केला होता. उत्तरेकडील मजार-ए-शरीफ येथील शिया मशिदीत झालेल्या स्फोटात 10 जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. Ukraine War: बुचानंतर आता मारियुपोलजवळ सापडली 9000 मृतदेहांची सामूहिक कबर, रिपोर्टमध्ये दावा IS सारखे जिहादी गट सूफींचा द्वेष करतात आणि त्यांना पाखंडी मानतात. ते त्यांच्यावर बहुदेववादाचा आरोप करतात. तत्पूर्वी शुक्रवारी, तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी मजार-ए-शरीफच्या मशिदीत गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या संदर्भात IS मास्टरमाइंडला अटक केली आहे.
First published:

Tags: Afghanistan, Bomb Blast

पुढील बातम्या