मॉस्को, 22 एप्रिल : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 58 दिवस पूर्ण झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरू झालेलं युद्ध अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यादरम्यान रशियाने मारियुपोल शहर जिंकण्याचा मोठा दावा केला आहे. त्याच मारियुपोलमधून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनियन अधिकार्यांनी भीती व्यक्त केली आहे की, मारियुपोलमधील सुमारे 3,000 ते 9,000 नागरिकांचे मृतदेह रशियन सैनिकांच्या ताब्यात असलेल्या मनहुशमधील सामूहिक कबरीत पुरले आहेत. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, मॅक्सर कंपनीच्या सॅटेलाइटमध्ये काही छायाचित्रं समोर आली आहेत, ज्यामध्ये 200 सामूहिक कबरी दिसल्या आहेत. मॅक्सोर म्हणाले की, या छायाचित्रांचं विश्लेषण केलं असता ही छायाचित्रं मार्चमध्ये उत्खननातून काढण्यात आल्याचं आढळून आलं आहे. शिवाय, वेळोवेळी थडग्यांची संख्याही वाढली आहे.
मारियुपोलमधील कबरींचं ठिकाण (फोटो सौजन्य : AP)
अहवालानुसार, “रशियन लोकांनी मारियुपोलच्या बाहेरील भागात मोठ्या संख्येने नवीन कबरी खोदल्या आणि एप्रिल महिन्यामध्ये दररोज त्या मृतदेहांनी भरल्या. मारियुपोल नगर परिषदेच्या सूत्रांनी सांगितलं की, अशा थडग्यांमध्ये एकामागून एक मृतदेह ठेवले जातात. तसेच गुरुवारी, मॅक्सर टेक्नॉलॉजीजनं सांगितलं की, छायाचित्रांमध्ये स्मशानभूमीचा विस्तार होत असल्याचं दिसून आलं आहे, ज्यामध्ये सुमारे 85 मीटर लांबीच्या रेषीय पंक्तींचे चार विभाग आहेत. बीबीसीने याचं वृत्त दिलं आहे. स्थानिक अंदाजानुसार मारियुपोलमध्ये रशियन सैन्याने मारलेल्या नागरिकांची संख्या 22,000 झाली आहे. हे वाचा - रशिया युक्रेन युद्धात जर्मनीचा बळीचा बकरा बनत आहे का? वाचा पडद्यामागच्या गोष्टी मारियुपोलचे महापौर वदिम बॉयचेन्को यांनी एका निवेदनात म्हटलंय की, “21 व्या शतकातील सर्वात वाईट युद्ध गुन्हेगारी मारियुपोलमध्ये घडली आहे. हे नवीन बेबीन यार (Babi Yar or Babyn/Babin Yar) आहे. हिटलरने त्यावेळी ज्यू, रोमन लोक आणि स्लाव्ह लोकांची हत्या केली. सध्या, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनियन जनतेचा नाश करत आहेत. बॅबिन यार ही युक्रेनची राजधानी कीवमधील एक दरी आहे आणि हे दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनविरुद्धच्या मोहिमेदरम्यान नाझी जर्मनीच्या सैन्याने केलेल्या नरसंहाराचे ठिकाण आहे. हे वाचा - Corona Spread : ‘या’ देशात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर, घराबाहेर पडण्यासही बंदी नगर परिषदेच्या म्हणण्यानुसार, रशियन सैनिकांनी मनहुशमध्ये अनेक सामूहिक कबरी खोदल्या आहेत आणि मारियुपोलमधल्या मारलेल्या रहिवाशांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी ट्रक चालवत आहेत. मार्चच्या मध्यापर्यंत, मारियुपोल नगरपालिका सेवांनी संपूर्ण शहर आणि त्याच्या बाहेरील भागात सुमारे 5,000 लोकांना दफन केले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, कीवच्या बाहेरील बुचा शहराच्या मॅक्सरच्या छायाचित्रांमध्ये उत्तर युक्रेनमधून रशियन परत येण्यापूर्वी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी एका गल्लीत नागरिकांचे मृतदेह दिसले. बुचाचे महापौर अनातोली फेडोरुक यांनी सांगितलं की, शहरात किमान 300 नागरिक मारले गेले आहेत.