• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भीषण! विमान आणि हेलिकॉप्टरची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू; पाहा VIDEO

भीषण! विमान आणि हेलिकॉप्टरची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू; पाहा VIDEO

विमान आणि हेलिकॉप्टर यांची हवेत (2 died in accident between plane and helicopter) समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 02 ऑक्टोबर : विमान आणि हेलिकॉप्टर यांची हवेत (2 died in accident between plane and helicopter) समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेत शुक्रवारी झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून विमानतळावरील (Airport operations stopped for a while) वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. असा झाला अपघात अमेरिकेतील एरिजोना विमानतळावर हवेत उड्डाण करणाऱ्या विमानाची आणि हेलिकॉप्टरची आमनेसामने भीषण टक्कर झाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर हेलिकॉप्टर क्रॅश होऊन जमिनीवर कोसळलं तर विमान सुरक्षितपणे लँड करण्यात वैमानिकाला यश आलं. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोघांचा मृत्यू झाला. विमानाचे सुरक्षित लँडिंग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैकलिमंस शहराच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. विमानाचा दोन इंजिने असल्यामुळे अपघातानंतर दुसऱ्या इंजिनाचा वापर करून सुरक्षित लँडिंग करण्यात पायलटला यश आलं. तर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे ते जमिनीवर कोसळलं. सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला. अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला होता. मात्र तातडीनं ही आग विझवण्यात यश आलं. या हेलिकॉप्टरमधून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान अपघात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचं संचलन ‘फ्लाईट ऑपरेशन्स अकॅडमी’कडे होतं. तर हेलिकॉप्टर चालवण्याचं प्रशिक्षण क्वांटम हेलिकॉप्टर नावाची संस्था करत होती. या दोन्ही प्रशिक्षण संस्था असून त्या विमानं आणि हेलिकॉप्टर उड्डाणाचं प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणासाठी चार आसनक्षमता असणाऱ्या विमानाचा वापर केला जातो. अपघातावेळी या विमानात दोन जणच होते. राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाकडून या अपघाताची चौकशी केली जात आहे. हे वाचा - पाकिस्तानमध्ये 127 रुपये लिटर पेट्रोल, पंतप्रधानांचं हास्यास्पद स्पष्टीकरण विमानतळ सुरक्षेसाठी बंद विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरु असतानाच हा अपघात घडला असून हेलिकॉप्टर आणि विमान या दोन्हींचं संचलन विद्यार्थीच करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. समोरासमोर झालेल्या या अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टरचे अवशेष विमानतळाच्या परिसरात कोसळले. मात्र त्यात कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती आहे. सुरक्षेसाठी काही काळ विमानतळ बंद ठेवण्यात आलं होतं.
  Published by:desk news
  First published: