• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • बापरे! पाकिस्तानमध्ये 127 रुपये लिटर पेट्रोल, पंतप्रधानांचं स्पष्टीकरण ऐकून लोक उडवतायत खिल्ली

बापरे! पाकिस्तानमध्ये 127 रुपये लिटर पेट्रोल, पंतप्रधानांचं स्पष्टीकरण ऐकून लोक उडवतायत खिल्ली

पाकिस्तानमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी (Cost of one liter petrol reached 127 in Pakistan) नागरिकांना तब्बल 127 रुपये मोजावे लागत आहेत.

 • Share this:
  लाहोर, 2 ऑक्टोबर : पाकिस्तानमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी (Cost of one liter petrol reached 127 in Pakistan) नागरिकांना तब्बल 127 रुपये मोजावे लागत आहेत. भारतातील नागरिकांपेक्षाही पाकिस्तानी नागरिकांना इंधन दरवाढीची (Pakistani citizens facing price hike of fuel) झळ बसायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानमध्ये एका दिवसात इंधनाच्या दरांत 4 ते 9 रुपयांची (Rs. 4 to 9 hike in single day)  वाढ इम्रान खान सरकारनं केली आहे. या दरवाढीबाबत सरकारने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून तर लोकांना हसावं की रडावं तेच कळेनासं झालं आहे. हास्यास्पद स्पष्टीकरण पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 127 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र याबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी इम्रान खान सरकारनं हास्यास्पद कारणमिमांसा करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानमधील पेट्रोलच्या किंमती या आपल्यासारख्या इतर देशांच्या तुलनेत म्हणजेच भारत किंवा बांग्लादेशच्या तुलनेत कमीच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या हास्यास्पद दाव्यामुळे सरकारची लोक खिल्ली उडवत असून पंतप्रधान इम्रान खान यांनी गांभिर्याने या मुद्द्याकडे पाहावं, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. जबरदस्त दरवाढ पाकिस्तानात एका दिवसात पेट्रोलचे दर 4 रुपयांनी, डिझेलचे दर 9 रुपयांनी, केरोसिन 7 रुपयानी तर हाय स्पीड पेट्रोल 2 रुपयांनी महाग झालं आहे. जगात जे देश तेलाचं उत्पादन करतात, केवळ त्याच देशांमध्ये तेल स्वस्त मिळत असल्याचा दावा पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तारिन यांनी केला आहे. जगभरात असे केवळ 16 देश असून इतर देशांमध्ये इंधनाच्या किंमती चढ्याच असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील किंमती या इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सरकारी तिजोरीवर भार पाकिस्तानने गेल्या काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पेट्रोलियम उत्पादनांवर लागणारा कर 2018 साठी 30 रुपये होता, तो आता 2 ते 3 रुपयांवर आणण्यात आल्याचा दावा पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे भारताप्रमाणे पाकिस्तानातील सर्वसामान्य जनताही पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीच्या कळा सहन करत आहे.
  Published by:desk news
  First published: