दोन महिन्यात 2.21 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या; तरी ट्रम्प का आहेत बिनधास्त?

दोन महिन्यात 2.21 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या; तरी ट्रम्प का आहेत बिनधास्त?

एप्रिल महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर 14.7 होता. अमेरिकेत 1948नंतर पहिल्यांदाच इतकी वाईट परिस्थिती आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 22 जून : अमेरिकेत मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. परिणामी या दोन महिन्यात तब्बल 2.21 कोटी लोकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मात्र तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी, "देशाची अर्थव्यवस्था विकसित होत आहे. रोजगाराच्या बाबतीत अमेरिकेने विक्रम केला आहे", असे वक्तव्य केले.

एप्रिल महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर 14.7 होता. अमेरिकेत 1948नंतर पहिल्यांदाच इतकी वाईट परिस्थिती आहे. मे महिन्यात बेरोजगारीचा दर 13.3 टक्क्यांनी घसरला, तर या महिन्यात 25 लाख लोकांनी नोकर्‍या गमावल्या.

वाचा-महाराष्ट्र सरकारने चीन कंपन्यांना दिला धक्का, 5 हजार कोटींचा प्रकल्प थांबवला

किरकोळ विक्रीच्या बाबतीत आम्ही विक्रम नोंदवला: ट्रम्प

अमेरिकेत कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं मार्च आणि एप्रिलमध्ये 2.21 कोटी लोकांच्या नोकर्‍या गेल्या. मेमध्ये काही व्यावसायिक संस्था उघडल्या गेल्या आणि पुन्हा कर्मचार्‍यांना कामावर घेण्यात आले. आकडेवारी पाहता ट्रम्प म्हणाले की अमेरिकन प्रशासन चांगले काम करत आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की अमेरिकन अर्थव्यवस्था एक विलक्षण काम करत आहे. ते असेही म्हणाले की, आपण एक विक्रम केला आहे. विक्रमी स्तरावर रोजगार निर्मिती केली आहे.

वाचा-COVID-19: लोकांना जीवनदान देणाऱ्या नीता अंबानी जगातील दानशूर व्यक्तींच्या यादीत

'गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रेडिट कार्ड अधिक खरेदी'

केव्हिन हॅसेट अमेरिका अध्यक्ष आणि माजी व्हाईट हाऊस आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष वरिष्ठ सल्लागार, काही दिवसांपूर्वी वातावरणातील बदलावर CNNशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशाची अर्थव्यवस्था नीट आहे असे सांगितले. हॅसेट म्हणाले की, अर्थशास्त्रज्ञांनी नम्र असले पाहिजे आणि आम्ही 17 राज्यांत जे साध्य केले ते स्वीकारले पाहिजे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या राज्यात क्रेडिट कार्ड खरेदी जास्त आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यास, देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होऊ शकते हे हॅसेट यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले की कोरोना विषाणूच्या पहिल्या संक्रमणामध्ये आपण जे पाहिले आणि जाणवले पण आता दुसरी लाट लहर तयार झाली तर शटडाउन करावे लागेल आणि अर्थव्यवस्थेला त्याचा त्रास होऊ शकतो.

वाचा-कोरोनाच्या संकटकाळात नोकरी गेल्यानंतरही द्यावा लागणार Income Tax, वाचा सर्व नियम

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 22, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या