नवी दिल्ली, 22 जून : कोरोना व्हायरसच्या संकटात अनेकांची आयुष्य वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या नीता अंबानी (Nita Ambani) यांचे नाव जगभरातील प्रमुख समाजसेवकांच्या (Philanthropists) यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित टाऊन अँड कंट्री या मॅगझिनकडून 2020 साठी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव असणाऱ्या नीता अंबानी या एकमेव भारतीय समाजसेविका आहेत. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, या यशाबरोबरच त्या रिलायन्स समूहाचे (Reliance Industries) नेतृत्व करत आहेत. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात समाजातील विविध घटकांसाठी मदत कार्य, गरीबांना जेवण आणि देशामध्ये पहिले कोव्हिड-19 (COVID-19) रुग्णालय बनवण्याचे काम यांसारख्या समाजकार्यासाठी त्यांना या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. नीता अंबानी यांच्यासोबत यादीमध्ये आहेत हे सेलिब्रिटी नीता अंबानी यांच्यासोबत टाउन अँड कंट्रीच्या या यादीमध्ये टिम कुक, ओपरा विनफ्रे, लॉरेन पॉवेल जॉब्स, लॉडर फॅमिली, डी. वर्साचे, मायकेल ब्लूमबर्ग, लिओनार्डो डि कॅप्रियो आणि इतरही बऱ्याच मान्यवरांचा समावेश आहे. नीता अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रयत्नांना उजाळा देताना लिहिलं की लॉकडाऊन दरम्यान फाउंडेशनने लाखो लोकांना अन्न दिलं. 7.2 कोटी डॉलर आपत्कालीन निधीला दान केले. इतकंच नाही तर भारतातील पहिलं कोव्हिड -19 रुग्णालय उभारणीसाठीही आर्थिक मदत केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.