जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Russia Ukraine War : पुतिन यांनी घेतला 'क्रूर बदला'; युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 ठार

Russia Ukraine War : पुतिन यांनी घेतला 'क्रूर बदला'; युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 ठार

फाईल फोटो

फाईल फोटो

झैपोरिझिया येथील निवासी भागात काल रात्री रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 लोक ठार झाले असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कीव 09 ऑक्टोबर : रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ चाललेलं युद्ध दिवसेंदिवस उग्र बनत चाललं आहे. ज्यामध्ये रशियन सैन्याला काही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर काही ठिकाणी युक्रेनच्या सैन्याला पराभवाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता या युद्धाबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. झैपोरिझिया येथील निवासी भागात काल रात्री रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 लोक ठार झाले असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. America Firing : मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जण ठार नुकतेच रशियाने युक्रेनच्या ज्या चार भागांना आपल्या देशात विलीन करण्याची घोषणा केली होती, त्यात झैपोरिझियांच नावही सामील झालं होतं. याव्यतिरिक्त, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 30 सप्टेंबर रोजी युक्रेनच्या लोहान्स्क, डोनेट्स्क आणि खेरसॉनचे रशियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे शनिवारी रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या पुलाचा अर्धा भाग भीषण स्फोटानंतर कोसळला. अद्याप कोणीही या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु क्रिमियन द्वीपकल्पातील रशियन समर्थित प्रादेशिक संसदेच्या स्पीकरने यासाठी युक्रेनला जबाबदार धरले आहे. त्याचवेळी रशियाने या स्फोटासाठी अद्याप कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. 100 विद्यार्थ्यांच्या उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या; हात-पाय एकत्र केले, शिक्षकाने सांगितलं ते भयंकर दृश्य खरं तर, या पुलावरून रशिया युक्रेनच्या दक्षिणेकडील भागात क्रिमियामार्गे युद्धासाठी सामान पाठवत असे. त्यामुळे युक्रेनचे अधिकारी कधीकधी या पुलावर हल्ला करण्याची धमकी देत ​​असत. पुलाचा स्फोट झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं. मात्र, त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. रशियाच्या दहशतवादविरोधी समितीने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, “ट्रकमध्ये ठेवलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाला, त्यानंतर इंधन वाहून नेणाऱ्या ट्रेनच्या सात बोगींना आग लागली. या स्फोटामुळे पुलाचे दोन भाग अर्धवट उद्ध्वस्त झाले. "

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात