मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

America Firing : मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जण ठार

America Firing : मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जण ठार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मेक्सिकन सिटी हॉलमध्ये एक कार्यक्रम सुरू होता, त्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. याचा व्हिडीओ कैद झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

लंडन 06 ऑक्टोबर : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता अमेरिकेतील मेक्सिकोच्या मेक्सिकन सिटी हॉलमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील सिटी हॉलमध्येएक गोळीबार झाला. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या गोळीबारात आतपर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार मेलेल्या लोकांच्या यादीत तेथील महापौरांचाही समावेश आहे.

नक्की काय घडलं?

मेक्सिकन सिटी हॉलमध्ये एक कार्यक्रम सुरू होता, त्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती हॉलमध्ये प्रवेश करतो आणि काही सेकंद थांबतो आणि अंदाधुंद गोळीबार करतो. या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला.

100 विद्यार्थ्यांच्या उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या; हात-पाय एकत्र केले, शिक्षकाने सांगितलं ते भयंकर दृश्य

यात महापौरांव्यतिरिक्त त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका पोलिसांचे अधिकारीही मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

" isDesktop="true" id="770200" >

या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भिंतीवर गोळीबार झाल्याच्या खुणा तुम्ही पाहू शकता. ज्यावर जवळपास 30-35 गोळ्या लागल्या असल्याचं तुम्ही पाहू शकता.

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, एका संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral