मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाण नागरिकांसह कोरोनाही भारताच्या आश्रयाला; काबूलहून दिल्लीला आलेले 16 जण Positive

अफगाण नागरिकांसह कोरोनाही भारताच्या आश्रयाला; काबूलहून दिल्लीला आलेले 16 जण Positive

काबूलहून दिल्लीला आलेल्या 78 निर्वासितांपैकी 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

काबूलहून दिल्लीला आलेल्या 78 निर्वासितांपैकी 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Afghanistan Crisis: मंगळवारी काबूलहून (Kabul) दिल्लीला (Delhi) आणण्यात आलेल्या 78 निर्वासितांपैकी 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न (16 refugees found corona infected) झालं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: मंगळवारी काबूलहून (Kabul) दिल्लीला (Delhi) आणण्यात आलेल्या 78 निर्वासितांपैकी 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न (16 refugees found corona infected) झालं आहे. त्यामध्ये गुरु ग्रंथ साहिब यांच्या तीन प्रती भारतात आणणाऱ्या तीन शीख बांधवांचा देखील समावेश आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि व्ही मुरलीधरन यांनी शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबच्या तीन प्रती (3 Scripture of Guru Granth Sahib) आदरपूर्वक स्विकारल्या आहेत. संबंधित 78 निर्वासितांना काबूलहून ताजिकिस्तानच्या दुशांबेमार्गे भारतात आणण्यात आलं आहे. या विमानातून गुरु ग्रंथ साहिबच्या या तीन प्रती आणि 44 अफगाण शीख बांधवांना भारतात आणलं आहे. अफगाणिस्तानातून या प्रती भारतात आणणाऱ्या तीन शीख बांधवाना देखील कोविडची लागण झाल्याचं आढळले आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंह म्हणाले की, 'अफगाणिस्तानातून श्री गुरू ग्रंथ साहिब यांच्या तीन प्रती आणणारे धर्मेंद्र सिंह, कुलराज सिंह आणि हिम्मत सिंह या तिघांनाही कोविडची लागण झाली आहे. संबंधित तिघे लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो.'

हेही वाचा-तालिबानविरुद्ध लढणाऱ्या पंजशीरची ताकद वाढली, अफगाणी सैनिक शस्त्रांसह आले मदतीला

विशेष म्हणजे सोमवारी भारतीय हवाई दलाच्या विमानानं 44 अफगाणी शीखांसोबत 78 जणांना काबूलहून ताजिकिस्तानच्या दुशांबे याठिकाणी आणण्यात आलं होतं. याबाबत माहिती देताना इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी सांगितलं की, संबंधित 78 जणांना एअर इंडियाच्या खास विमानानं मंगळवारी सकाळी 9.50 च्या सुमारास दिल्लीला आणण्यात आलं आहे. इंडियन वर्ल्ड फोरम हे परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय हवाई दलासोबत समन्वय साधत युद्धभूमीत अडकलेल्या नागरिकांना मदत करत आहे.

हेही वाचा-तालिबान्यांना आव्हान देणारा एकमेव वीर; अहमद मसूद आहे तरी कोण?

लवकरच 75 अफगाण शीख आणि हिंदूंना भारतात आणलं जाणार  

चंडोक यांनी पुढं सांगितलं की, जवळपास 200 अफगाण शीख आणि हिंदू नागरिक अजूनही अफगाणिस्तानात अडकले आहेत. या लोकांनी काबूल विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या करते परवान गुरुद्वारात आश्रय घेतला आहे. यातील जवळपास 75 नागरिकांना लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत भारतानं जवळपास 730 लोकांना अफगाणिस्तानातून सुखरुप बाहेर काढलं आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban