सिऊल, 29 ऑक्टोबर : हॉलोविन पार्टी… नावानुसारच लोक भूतासारखा गेटअप करून येतात. पण दक्षिण कोरियात अशीच हॅलोविन पार्टी खरोखरच भयावह ठरली आहे. राजधानी सिऊलमध्ये मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला. याचे धक्कादायक व्हिडीओही समोर आले आहेत. ज्यात एकाच वेळी 50 पेक्षा अधिक लोकांना हार्ट अटॅक आला आहे. कोरोना लॉकडाऊननंतर जवळपास दोन वर्षांनी कोरोना नियमातून मुक्तता मिळाली आणि लोक सण-उत्सव, पार्टीचा भरभरून आनंद घेऊ लागले आहेत. जसं भारतात गणेशोत्सव, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. तसंच इतर देशांतही त्यांचे कार्यक्रम आयोजित होत आहेत. दक्षिण कोरियातही अशीच आऊटडोर नो मास्क हॅलोविन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी देशाची राजधानी सिऊलमध्ये लोकांची गर्दी झाली.
#SouthKorea: About 81 people have been receiving CPR after suffering from cardiac arrest in #Seoul's #Itaewon area due to overcrowding during the #Halloween festivities in Itaewon, a popular nightlife district in Seoul. pic.twitter.com/EjvJF3Ij9n
— Siraj Noorani (@sirajnoorani) October 29, 2022
पार्टीदरम्यान एका छोट्या रस्त्यावरून पुढे जाताना चेंगराचेंगरी झाली. काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागली, त्यापैकी काही जणांना हार्ट अटॅकही आला.
मीडिया रिपोर्टनुसार 50 पेक्षा अधिक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तर शेकडोपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय अग्निशमन संस्थेचे अधिकारी चोई चेओन सिक यांनी सांगितलं की, इटावोनमध्ये शनिवारी रात्री गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 100 लोक जखमी झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इटावोनच्या रस्त्यावर लोकांना सीपीआर दिला दातो आहे. तर काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यूं सुक येओल यांनी या घटनेची माहिती मिळताच योंगसान-गु जिल्ह्यातील इटावोनमध्ये तात्काळ आपत्कालीन टीम पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना त्वरित उपचार मिळायला हवेत आणि घटनास्थळाच्या सुरक्षेची तपासणी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.