सिऊल, 29 ऑक्टोबर : हार्ट अटॅकची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एकाच वेळी 50 पेक्षा अधिक लोकांना हार्ट अटॅक आला आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधील ही भयानक घटना आहे. पार्टीत मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला आहे. या भयंकर घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कोरोना लॉकडाऊननंतर जवळपास दोन वर्षांनी कोरोना नियमातून मुक्तता मिळाली आणि लोक सण-उत्सव, पार्टीचा भरभरून आनंद घेऊ लागले आहेत. जसं भारतात गणेशोत्सव, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. तसंच इतर देशांतही त्यांचे कार्यक्रम आयोजित होत आहेत. दक्षिण कोरियातही अशीच आऊटडोर नो मास्क हॅलोविन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी देशाची राजधानी सिऊलमध्ये लोकांची गर्दी झाली. हे वाचा - एक बेट मृत्यूचं! असं बेट जिथे 1 लाख 60 हजार जणांना जिवंत जाळलं, आजही भेट देण्यास आहे बंदी पार्टीदरम्यान एका छोट्या रस्त्यावरून पुढे जाताना चेंगराचेंगरी झाली. काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागली, त्यापैकी काही जणांना हार्ट अटॅकही आला. मीडिया रिपोर्टनुसार 50 पेक्षा अधिक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तर शेकडोपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. काही लोकांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. राष्ट्रीय अग्निशमन संस्थेचे अधिकारी चोई चेओन सिक यांनी सांगितलं की, इटावोनमध्ये शनिवारी रात्री गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 100 लोक जखमी झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इटावोनच्या रस्त्यावर लोकांना सीपीआर दिला दातो आहे. तर काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यूं सुक येओल यांनी या घटनेची माहिती मिळताच योंगसान-गु जिल्ह्यातील इटावोनमध्ये तात्काळ आपत्कालीन टीम पाठवण्याचे आदेश दिले आहेत. हे वाचा - Explainer : धमाक्याशिवाय हाहाकार, काय आहे ‘डर्टी बॉम्ब’? रशिया टेन्शनमध्ये! जखमींना त्वरित उपचार मिळायला हवेत आणि घटनास्थळाच्या सुरक्षेची तपासणी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.