मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Taliban @100 | 100 दिवसांत तालिबान्यांनी अफगाणिस्तानाचं काय केलं? सरकारसमोर संकटांचा डोंगर!

Taliban @100 | 100 दिवसांत तालिबान्यांनी अफगाणिस्तानाचं काय केलं? सरकारसमोर संकटांचा डोंगर!

100 Days of Taliban Rule in Afghanistan: तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करुन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादी सत्ता उलथवून देश काबीज करणं सोपं आहे, पण आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणं नाही, हा धडा आतापर्यंत तालिबान्यांना मिळाला आहे. या 100 दिवसांत तालिबान सरकारसमोर हजारो प्रश्न आ वासून उभे आहेत. मग शंभर दिवसात सरकारनं काय केलं?

100 Days of Taliban Rule in Afghanistan: तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करुन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादी सत्ता उलथवून देश काबीज करणं सोपं आहे, पण आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणं नाही, हा धडा आतापर्यंत तालिबान्यांना मिळाला आहे. या 100 दिवसांत तालिबान सरकारसमोर हजारो प्रश्न आ वासून उभे आहेत. मग शंभर दिवसात सरकारनं काय केलं?

100 Days of Taliban Rule in Afghanistan: तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करुन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादी सत्ता उलथवून देश काबीज करणं सोपं आहे, पण आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणं नाही, हा धडा आतापर्यंत तालिबान्यांना मिळाला आहे. या 100 दिवसांत तालिबान सरकारसमोर हजारो प्रश्न आ वासून उभे आहेत. मग शंभर दिवसात सरकारनं काय केलं?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

काबूल, 25 नोव्हेंबर: अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादी सत्ता उलथवून देश काबीज करणं सोपं आहे, पण आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणं नाही, हा धडा आता तालिबान्यांना मिळाला आहे. सध्या इराण, पाकिस्तान, चीन, रशिया, तुर्की, कतार, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, इटली आणि संयुक्त अरब अमिराती या 11 देशांनी अफगाणिस्तानमध्ये दूतावास उघडल्याची माहिती समोर आली आहे. तालिबान अजूनही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या हा देश वाढती उपासमारी, गुन्हेगारी, रोख रकमेचा अभाव आणि इस्लामिक स्टेट (ISIS-K in Afghanistan) च्या प्राणघातक हल्ल्यांमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आतापर्यंतचे 100 दिवस कसे होते?

तालिबानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी संबंध निर्माण करण्यासाठी आणि देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अनेक प्रादेशिक आणि दूरच्या देशांना भेटी दिल्या आहेत. त्यानंतर किमान सहा देशांच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तानला भेट दिली आणि तालिबानच्या नेतृत्वासोबत बैठका घेतल्या. या 100 दिवसांत अफगाणिस्तानमध्ये सहा महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बैठका झाल्या आहेत. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इराण, पाकिस्तान, भारत, रशिया आणि चीनने बैठका आयोजित केल्या आहेत. याशिवाय जी-20 देशांचे नेते आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाली आहे.

15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर कब्जा केला

15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला. त्या दिवशी अमेरिकन शस्त्रास्त्रांसह तालिबानी सैनिक राष्ट्रपती भवनात घुसले. याच्या काही वेळापूर्वी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी छोटेखानी भाषण केले आणि ते देशाबाहेर गेले. तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकन आणि पाश्चिमात्य सैन्याच्या माघारीला वेग आला. 20 वर्षानंतर अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली. ही माघार 31 ऑगस्टच्या डेडलाइन आधी झाली.

लान्स क्लुसनर Taliban च्या प्रेमात; म्हणाला ते तर आमच्यासाठी ...

प्रमुख आव्हानं काय?

ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर येण्यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांचे सरकार आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीने हिवाळ्यात या धोक्याचा सामना करेल असा विश्वास होता. मात्र, त्यांचे सरकार पडल्यानंतर मदत मिळण्याचा आत्मविश्वासही मावळला. पाश्चात्य देशांनी अफगाणिस्तानला मिळणारी मदत थांबवली आहे. मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखणाऱ्या आणि देशात शरिया कायदा पुन्हा लागू करणाऱ्या शासनाला त्यांना मदत करायची नाही.

तालिबानने काबूलवर ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानसमोरही उपासमारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था कमालीची ढासळली आहे. अफगाणिस्तानातील लाखो लोकांना उपासमारीचा धोका असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार येथील 95 टक्के लोकांकडे पुरेसे अन्न नाही. येथील 2.3 कोटी लोक उपासमारीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पुढील सहा महिने देशासाठी संकटमय असणार आहेत. अफगाणिस्तानकडे पाठ फिरवू नये आणि संकटात सापडलेल्यांना मदत करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्राने जगाला केले आहे.

Afghanistan news: बागलान प्रांतात 300 तालिबानी ठार

तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यापासून बहुतांश महिला कामगारांना त्यांच्या घरातच बंदिस्त करण्यात आले आहे. काबूलमध्ये महिलांनी निदर्शने सुरूच ठेवली आहेत, पण परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. महिला पत्रकारांनाही काम करू दिले जात नाही. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसह काही महिलांनाच काम करण्याची परवानगी आहे.

तालिबानने सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाचे आश्वासन दिले होते. मात्र परिस्थिती तालिबानच्या नियंत्रणात असल्याचे दिसत नाही. सर्वात मोठे आव्हान इस्लामिक स्टेटकडून येत आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे की इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानात जवळपास सर्वत्र अस्तित्वात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इस्लामिक स्टेटचे हल्ले वाढले आहेत.

अफगाण परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सल्लागार फखरुद्दीन करिझादा म्हणतात, "या 100 दिवसांमध्ये, इस्लामिक अमिरातीची मुत्सद्दीगिरी आणि परराष्ट्र धोरण काही शेजारी आणि प्रादेशिक देशांपुरते मर्यादित राहिले आहे(Taliban Afghanistan Control). तालिबान याआधी दिलेली वचनबद्धता पूर्ण करतो की नाही याची जगभरातील देश वाट पाहत आहेत. स्थानिक टोलो न्यूजनुसार, सध्या इराण, पाकिस्तान, चीन, रशिया, तुर्की, कतार, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, इटलीसह 11 देश आणि संयुक्त राष्ट्र अरब अमिराती यांनी अफगाणिस्तानमध्ये आपली दूतावास उघडली आहेत.

Afghanistan क्रिकेटचा टेस्ट दर्जा जाणार, Taliban च्या एका निर्णयामुळे

अफगाण संकटावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याची गरज

अफगाणिस्तानच्या संकटावर चर्चेतून सर्वसमावेशक राजकीय तोडगा काढण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार भारताने पुन्हा एकदा केला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर कोणत्याही देशाला हानी पोहोचवण्यासाठी करू नये, असेही म्हटले आहे.

बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, 'भारत अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर सर्व संबंधित देशांच्या संपर्कात आहे. मात्र, या कठीण परिस्थितीत आपण कसे पुढे जाऊ शकतो, हेही पाहावे लागेल. भारत आपल्या प्रदेशातील नवीन धोरणात्मक वास्तवांसाठी असुरक्षित नाही.'

First published:

Tags: Afghanistan, Taliban, Terrorist