मराठी बातम्या /बातम्या /विदेश /जगभरातल्या 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण, भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

जगभरातल्या 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण, भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

Delta Plus Variant: दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातल्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हानं उभं राहिलं आहे. जगभरात या व्हेरिएंटमुळे वाढणारी भीती अधिकाधिक होत चालली आहे.

Delta Plus Variant: दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातल्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हानं उभं राहिलं आहे. जगभरात या व्हेरिएंटमुळे वाढणारी भीती अधिकाधिक होत चालली आहे.

Delta Plus Variant: दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातल्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हानं उभं राहिलं आहे. जगभरात या व्हेरिएंटमुळे वाढणारी भीती अधिकाधिक होत चालली आहे.

नवी दिल्ली, 24 जून: कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातल्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हानं उभं राहिलं आहे. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा प्लस (Delta plus variant) व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला. दरम्यान जगभरात या व्हेरिएंटमुळे वाढणारी भीती अधिकाधिक होत चालली आहे. जगभरातल्या 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (Delta plus in 11 countries) रुग्ण आढळून आले आहेत.

16 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, जगभरातल्या 11 देशांमध्ये कमीतकमी 197 प्रकरणे आढळली आहेत. त्यात ब्रिटनमध्ये 36, कॅनडामध्ये 1, भारतात 8, जपान 15, नेपाळ 3, पॉलंड 9, पोर्तुगाल 22, रशिया 1, स्वित्झर्लंड 18, तुर्की 1, अमेरिका 83, ही 11 देशातली आकडेवारी आहे. दरम्यान 23 जूनपर्यंत भारतातील आकडा 40 पर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा- मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत सर्वात महत्त्वाची बैठक 

भारतात महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशात डेल्टा प्लस व्हेरिएंटची जवळपास 40 प्रकरणे आढळली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.

दरम्यान भारतात या व्हेरिएंटमुळे पहिला बळीही गेला आहे. डेल्टा प्लस कोरोनाची लागण झालेल्या एका महिला रुग्णाचा मृत्यू (Delta plus death) झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमधील महिलेचा डेल्टा प्लस कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार तिने कोरोना लस घेतली नव्हती. तर कोरोना लस घेतलेला तिचा नवरा पूर्णपणे ठिक आहे.

डेल्टा प्लस कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर केरळ, मध्य प्रदेश (Maharashtra, Kerala and Madhya Pradesh) या राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 21, मध्य प्रदेश 6, केरळ 3, रुग्ण आढळून आलेत. याव्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये 3 तर पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण सापडलेत.

आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भारतीय एसएआरएस-सीओव्ही -2 जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हेरिएंटवर काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus