राज्यात मागील अनेक दिवसांपासून कडाक्याचं ऊन पडतंय. परंतु आता काहीसं दमट वातावरणही अनुभवायला मिळतं. आता तर हवामान विभागाने काही भागांमध्ये चक्क पावसाची शक्यता वर्तविली आहे. उन्हात पडणाऱ्या या पावसामुळे घामाच्या धारांपासून काहीसा दिलासा मिळणार असला, तरी शेतकरी बांधवांची चिंता मात्र वाढणार आहे.