शिकागोच्या मार्टिनटनमध्ये सोयाबीनने भरलेली 90 फुट उंच चाकी कोसळली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ही टाकी कोसळल्याने या टाकीत साठवलेले 816 टन सोयाबीनचं नुकसान झालं. ही टाकी थेट इलेक्ट्रिकच्या तारांवर कोसळल्याने काही काळ या भागातील वीज परवठा खंडित झाला होता. ...