मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाचे उद्घाटन आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमध्ये वाढलेल्या भेटीगा...