साडीमध्ये वावरण्याची सवय ही स्त्रीयांना उपजतच असते असं म्हणतात. परंतु उन्हाळ्यात भरदुपारी साडी नेसून एखाद्या समारंभात जायचं म्हटलं तर नुसत्या विचारानेच शरिराला घाम फुटतो. मग समारंभाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत काही विचारायलाच नको. परंतु उन्हाळ्यात जर दिवसभर साडीत एकदम कम्फर्टेबल राहायचं असेल तर कॉटनची स...