केवळ 0.77 ग्रॅम वजनाचं चिमुकलं पण वाऱ्याच्या वेगानं भरारी घेणारंं विमान तयार करण्यात आलंय. या इनडोअर विमानाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालीये. विमान तयार करणारे नागपुरातील एरोमॉडेलिंग तज्ज्ञ डॉ. राजेश जोशी यांनी ही माहिती दिली.