आज पाडवा — साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त! या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा असल्याने सिंधुदुर्गात सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सोन्याचे दर वाढले असले तरी आज थोडेसे दर उतरल्याने ग्राहकांनी झुंबड उडवली. स्थानिक बाजारपेठा आणि ज्वेलर्स दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची ये-जा सुरु हो...