अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. अशातच सोलापुरातील एका तरुणाने हजारो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आहे. सागर नागनाथ कांबळे असे या तरुणाचे नाव असून बार्शी रोड भोगाव येथे शेव चिवडा विक्री करण्...