वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या तर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव सुरू आहे. यामध्ये पुणेकरांना सुमारे 250 पुस्तकांच्या स्टॉल्समधून 15 पेक्षा अधिक भाषांमधील सुमारे दोन लाख पुस्तके पाहण्य...