विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांच्या श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आता मुंबई-पुण्यातून भाविकांसाठीही वंदे भारत ट्रेनमधून शेगावपर्यंत वेगवान प्रवास करता येणार आहे.