विदर्भातील खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे कळण्याचे गोळे. कळण्याच्या गोळ्याची भाजी विदर्भात आवडीने खाल्ली जाते. तुरीच्या नवीन डाळीपासून कळणा तयार होतो. या कळण्यापासून कळण्याच्या गोळ्याची भाजी कशी बनवायची? याचीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.