आपण आपल्या पायावर उभे राहीपर्यंत सर्वतोपरी आई वडिलांवर अवलंबून असतो. मात्र कमावते झाल्यावर तेच आई-वडील आपल्याला ओझे वाटू लागतात. याच कारणामुळे आजकाल वृद्धाश्रमांमध्ये वयस्कर लोकांची संख्या वाढू लागली आहे. मात्र कोल्हापुरात या विरोधात एक मोहीम एका ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. दऱ्याचे वडगाव या ग्रामप...