विशाखापट्टणममध्ये भारत आणि इंग्लंड संघात दुसरी कसोटी होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात सरफराज खान आणि रजत पाटीदार या दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण अंतिम अकरात सरफराजला संधी मिळणार की पाटीदारला? याचीच उत्सुकता आहे.