राजकोट कसोटीत भारतीय संघानं कसोटी इतिहासातला सर्वात मोठा विजय साजरा केला. यशस्वी जैसवालचं द्विशतक, रवींद्र जाडेजाची अष्टपैलू खेळी आणि पदार्पणातच सरफराज खानची दोन्ही डावात अर्धशतकं हे भारताच्या यशाचं सार ठरलं.