वातावरणातील बदल, उन्हात पाऊस आणि पावसात ऊन अशी परिस्थिती असतानादेखील शेतकरी बांधव वेगवेगळे प्रयोग करून उत्पादनातून फायदा कसा मिळवायचा यावर तोडगा शोधू लागले आहेत. आता अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून फळझाडं, फूलझाडं आणि भाजीपाला लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवतात. जालना जिल्ह्यातील दहिफळ गावचे रहिवासी द...