सध्याच्या घडीला शेतकरी हे शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. बीड जिल्ह्यातील विष्णू राठोड यांची शेतकरी वर्गात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्याचा धाडसी प्रयत्न केला. विष्णू राठोड यांचा जीवन प्रवास अगदी संघर्षमय आहे. पदवी शिक्षण पूर्ण केल्यान...