चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, एवढा चहा भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात चहानेच लोकांच्या दिवसाची सुरुवात होते. आता तर चहाचे वेगवेगळे ब्रँड आणि प्रकारही पाहायला मिळतात. प्रत्येक शहरात चहाचं फार जुनं किंवा प्रसिद्ध असं हॉटेल असतं. जालना शहरात जयशंकर इथं मिळणारा चहा अतिशय ल...