चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहताय. चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठ...