चित्रपट कलाकारांना भाजपने किंवा एखाद्या पक्षानं संधी देणं ही काही नवी बाब नाही. पण भाजपनं नुकत्याच जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत नावाजलेल्या चार भोजपुरी चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यामुळे भाजपच्या भोजपुरी थिअरीची सध्या चर्चा होतेय.