राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ₹३१ हजार ६६५ कोटींच्या मदत पॅकेजने शेतकऱ्यांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे. मात्र, सरकारने दिवाळीपूर्वी ही मदत थेट खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, मदतीसाठी असलेल्या सर्व अटी व शर्ती वग...