मोठ मोठ्या शहरांमध्ये परदेशी भाज्यांना मोठी मागणी आहे. या भाज्यांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न आणि नफा मिळू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावातील शेतकरी धनंजय चव्हाण होय. धनंजय आणि त्यांची पत्नी आशा हे गेले 14 वर्षापासून 16 परदेशी भाज्यांची शेती करत असून महिन...