महादेव अॅप प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे. परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्जाचा घोटाळा झाला असून त्यामागे परळीचा ‘आका’ आहे असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला आहे. महादेव बेटिंग अॅप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल असा आरोपही त्यांनी केला...