मुंबई, 03 मे : हिंदी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक सरस सिनेमा देणारा आर के स्टुडिओ आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीजनं हा स्टुडिओ खरेदी केला असून इथं आता सिनेमाच्या शुटिंग ऐवजी आलिशन फ्लॅट्सची निर्मिती होणार आहे. गेली सात दशकं सिनेरसिकांच्या मनावर आर.के स्टुडिओनं अधिराज्य गाजवलं. ...