मुंबई, 09 फेब्रुवारी : सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देत आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना इशारा दिला. आज मोर्चाचं उत्तर मोर्चानं दिलंय, उद्या तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ, अशी राजगर्जना आज आझाद मैदानावर केली. एनआरसीविरोधात मुस्लीम मोर्चे का काढतायेत हे मला समजलं नाही, त्यांनी आपली ताकद दाखवून द्यायचं कारणच काय, असा सवालही राज ठाकरेंनी केला. तसंच, मराठी मुस्लिम जिथे राहतात तिथे कधीही दंगली होत नाहीत, कारण मराठी मुस्लिम याच मातीतला आहे, असं राज म्हणाले.