• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धनंजय हे तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते -पंकजा मुंडे
  • VIDEO : धनंजय हे तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते -पंकजा मुंडे

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 10:57 PM IST | Updated On: Jan 30, 2019 05:16 PM IST

    29 जानेवारी : 'धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते', असल्याचा गंभीर आरोप महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसंच 'माझी प्रतिमा मलीन करण्यासाठीच त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या न्यूज18 लोकमतच्या न्यूज रूम चर्चेत बोलत होत्या. यावेळी पंकजा मुडे म्हणाल्या, "आमच्या घराण्याची ताकद मोठी होती. बाबा मंत्री होते. मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केलं. एवढं सगळं देऊनही तो राष्ट्रवादीत गेला. तो जर भाजपमध्ये असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं. पण आता आमचे मार्ग वेगळे आहे." अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी