मुंबई, 31 जुलै : देशात ट्रेनचं जाळं मोठं आहे. देशांर्गत प्रवासासाठी लोक मोठ्या प्रमाणात रेल्वेचा वापर करतात. तुम्हीही अनेकदा ट्रेनमधून प्रवास करत असाल. त्यामुळेच तुम्हाला रेल्वेशी संबंधित नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. स्लीपर किंवा एसी कोचबद्दल बोलायचे झाले तर, येथे जागा लोअर, मिडल किंवा अप्परच्या क्रमाने आहेत. पण तुम्ही विचार केला आहे का की विंडो सीटवर बसण्याचा अधिकार कोणाला आहे? कोचमध्ये लोअर आणि मिडल क्लाससाठी वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे विंडो सीटवर बसण्याच्या अधिकाराबद्दल माहिती घेऊया. चेअर कारमध्ये होतं विंडो सीट वाटप स्लीपर आणि एसी कोचच्या विंडो सीटबद्दल तिकिटावर कोणतीही माहिती नसते. जिथे खिडकी आहे त्या सर्व खालच्या सीट असतात. अशा परिस्थितीत विंडो सीटवर कोण बसणार हे कसे ठरवले जाते? हा प्रश्न आहे. विंडो सीटवर बसण्याचे चेअर कारमध्ये ठरवले जाते. स्लीपर किंवा एसी कोचमध्ये असे होत नाही. ITR Filing: इनकम टॅक भरण्याचा आज शेवटचा दिवस; डेडलाईन चुकल्यास जेलमध्येही जावं लागू शकतं प्रवासी परस्पर ठरवतात अशा परिस्थितीत विंडो सीटवर कोण बसणार आणि कोण नाही हे कसे ठरवले जाते. तर या डब्यांमध्ये जागा वाटप वेगळ्या पद्धतीने होते. स्लीपर किंवा एसीमध्ये विंडो सीटवर बसण्यासाठी रेल्वेने कोणतेही विशिष्ट नियम बनवलेले नाहीत. कोण कुठे बसणार हे प्रवासी एकमेकांशी बोलून ठरवतात. बँक ऑफ बडोदाकडून उद्यापासून महत्त्वाचा नियम लागू; ग्राहकांना काय करावं लागणार? असे मानले जाते की लोअर सीटच्या प्रवाशाला खालच्या सीटवर खिडकीच्या बाजूला बसण्याचा अधिकार असतो. तसंही लोअर सीटवर बसण्याचा अधिकार फक्त दिवसा आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत प्रवाशाला त्याच्या सीटवर झोपण्याचा अधिकार आहे. दरम्यान, टीटीईही प्रवाशांना त्रास देऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.