जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बँक ऑफ बडोदाकडून उद्यापासून महत्त्वाचा नियम लागू; ग्राहकांना काय करावं लागणार?

बँक ऑफ बडोदाकडून उद्यापासून महत्त्वाचा नियम लागू; ग्राहकांना काय करावं लागणार?

बँक ऑफ बडोदाकडून उद्यापासून महत्त्वाचा नियम लागू; ग्राहकांना काय करावं लागणार?

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकाला चेक लाभार्थ्यांना देण्यापूर्वी त्याचा तपशील द्यावा लागेल जेणेकरून बँक कोणत्याही पडताळणी कॉलशिवाय 5 लाखांचा चेक पेमेंटसाठी सादर करू शकेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जुलै : बँक ऑफ बडोदामध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने चेकबाबतच्या नियमात बदल करणार आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी पॉझिटिव्ह पे कर्न्फमेशन नियम लागू होईल. आता बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकमधील महत्त्वाची माहिती व्हेरिफाय करण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बँकेकडे पडताळून पाहावी लागेल. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकाला चेक लाभार्थ्यांना देण्यापूर्वी त्याचा तपशील द्यावा लागेल जेणेकरून बँक कोणत्याही पडताळणी कॉलशिवाय 5 लाखांचा चेक पेमेंटसाठी सादर करू शकेल. बँकेच्या परिपत्रकानुसार, 1 ऑगस्टपासून 5 लाख रुपये आणि त्यावरील चेकसाठी पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन अनिवार्य केले जाईल. कर्न्फमेशन नसल्यास, चेक परत केला जाऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणुकीवर 10 नाही तर 100 पट परतावा मिळेल; फक्त एक सुत्र पाळावं लागेल पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे काय? पॉझिटिव्ह पे सिस्टीममध्ये, बँकेला ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेच्या चेकचे मूल्य बँकेला कळवावे लागते. पेमेंट करण्यापूर्वी बँक ते तपासते. हे एक ऑटोमॅटिक फसवणूक शोधण्याचे साधन आहे. आरबीआयने हा नियम लागू करण्याचा उद्देश चेकचा गैरवापर रोखणे हा आहे. 6 लाखांची गुंतवणूक करून दरमहा कमवा 1 लाख रूपये, या व्यवसायात मिळेल भरपूर नफा पॉझिटिव्ह पे सिस्टीम अंतर्गत, एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाईल बँकिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेक जारी करणार्‍याला चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, खाते क्रमांक, एकूण रक्कम, व्यवहार कोड आणि चेक क्रमांक याची पुष्टी करावी लागेल. चेक पेमेंट करण्यापूर्वी बँक या तपशीलांची उलटतपासणी करेल. त्यात काही तफावत आढळल्यास बँक चेक नाकारेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात