मुंबई, 31 जुलै : आयकर रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र अनेकांना अशी अपेक्षा आहे की सरकार रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवू शकते. सरकारने शेवटची तारीख वाढवली नाही, तर आयकर रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे. जर तुम्हाला मागील आर्थिक वर्षात पगार किंवा इतर स्रोतांमधून उत्पन्न मिळाले असेल आणि ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्यासाठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. विवरणपत्र भरले नाही तर दंड भरावा लागेल. आयकर कायद्यानुसार, 31 डिसेंबर 2022 पर्यंत दंड आणि करावरील व्याजासह रिटर्न भरता येतात. या तारखेनंतर रिटर्न भरण्याची संधी मिळणार नाही. आयकर विभाग त्यानंतर काही विशिष्ट परिस्थितीत करदात्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो. बँक ऑफ बडोदाकडून उद्यापासून महत्त्वाचा नियम लागू; ग्राहकांना काय करावं लागणार? किती दंड आकारला जाईल? 31 डिसेंबर 2022 पर्यंत 5000 रुपयांच्या दंडासह रिटर्न भरता येईल. मात्र, कराच्या रकमेवर व्याज आकारले जाईल. करदात्याचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास केवळ 1000 रुपये दंड आकारला जाईल. 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिटर्न न भरल्यास आयकर विभाग करदात्याला नोटीस पाठवू शकतो, असे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानंतर, त्याच्या कराच्या रकमेवर 50 ते 200% दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय देय तारखेपासून रिटर्न भरेपर्यंत कराच्या रकमेवरही व्याज आकारले जाऊ शकते. आयकर विभागाला करदात्यावर खटला भरण्याचा अधिकार आहे. 6 लाखांची गुंतवणूक करून दरमहा कमवा 1 लाख रूपये, या व्यवसायात मिळेल भरपूर नफा …तर तुरुंगात जावे लागू शकते आयकर कायद्यानुसार ITR फाईन न केल्यास 6 महिने ते कमाल 7 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. पण, यासाठी काही अटी आहेत. आयकर विभाग कराची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल अशा प्रकरणांमध्येच करदात्यावर खटला भरू शकतो. प्राप्तिकर विभाग आपल्या ट्विटर हँडलद्वारे करदात्यांना रिटर्न भरण्याची सतत आठवण करून देत आहे. हे एसएमएस आणि ईमेलद्वारे करदात्यांना सतत रिमाईंडर पाठवत आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, 25 जुलैपर्यंत 3 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.