स्वस्तात परेशात फिरायला जायचं असेल तर 'या' देशाला भेट द्या! 521 रुपयांची किंमत आहे एक लाख

स्वस्तात परेशात फिरायला जायचं असेल तर 'या' देशाला भेट द्या! 521 रुपयांची किंमत आहे एक लाख

जर तुम्हाला परदेशात तुमच्या लाइफ पार्टनरसोबत स्वस्तात काही दिवस घालवायचे असतील तर तुम्ही इंडोनेशियाच्या (Indonesia) या शहराला नक्की भेट द्या.

  • Share this:

मुंबई, 3 जानेवारी : आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी परदेशात जाण्याचा मोह झालेला असतो. तर लग्न झाल्यानंतर आपला हनिमून कायम आठवणीत राहावा यासाठी अनेक जोडप्यांनाही परदेशात जाण्याची इच्छा असते. मात्र, परदेशात जाण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च पाहता त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. जर तुम्हाला देखील तुमच्या लाइफ पार्टनरसोबत, कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रीणींसोबत स्वस्तात परदेशात काही दिवस घालवायचे असतील तर इंडोनेशिया तुमच्यासाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे. इंडोनेशियाच्या या शहरात तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत घालवलेले क्षण नेहमीच तुमच्या लक्षात राहतील. सर्वात महत्वाचं म्हणजे येथील सहल तुमच्या बजेटमध्ये असेल. इंडोनेशियाच्या प्रेमात पडावं असं काय आहे येथे? चला जाणून घेऊया.

इंडोनेशियातील सर्वात प्रेक्षणीय आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत बाली अव्वल आहे. हे शहर सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. कौटुंबिक सहलीला जाणे असो, हनिमून, बजेट प्रवास, लक्झरी अनुभव, एक्सप्लोर, सर्फिंग किंवा आध्यात्मिक आनंद... सर्व प्रकारचे पर्यटक आणि भटके बालीकडे आकर्षित होतात. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता आणि येथील आलिशान व्हिलामध्ये रोमँटिक वेळ घालवू शकता. तुम्ही इंडोनेशियातील बालीसह इतर कोणत्याही शहराला भेट देण्याची योजना आखू शकता, कारण येथे एका महिन्यापेक्षा कमी प्रवासासाठी व्हिसा विनामूल्य आहे.

मनमोहक लहान बेटे

बाली व्यतिरिक्त, इंडोनेशियातील लहान बेटे देखील मनमोहक दृश्यांनी भरलेली आहेत. सर्वात खास गिली बेट आहे. हा 3 बेटांचा समूह आहे - गिली टवांगन, गिली मेनो आणि गिली एअर. स्पीड बोटीतून पडांग खाडीत पोहोचायला एक तास लागतो. येथील समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ आहेत. समुद्राचे पाणी देखील अतिशय स्वच्छ आहे. बोट पार्ट्या ही इथली शान आहे. बोट राईड करताना 4-5 तास पार्टी आणि मस्तीमध्ये तुमचे कसे निघून जातील हे कळणार देखील नाही.

बालीचे हृदय.. कुटा

कुटा, सेमिन्यक आणि जिम्बरान ही दक्षिण बालीमधील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कुटा हे बालीचे हृदय आणि केंद्र आहे, तर सेमिन्यक हा समुद्रकिनारा आहे. येथे हाय-फाय रेस्टॉरंट्स आणि ट्रेंडी फॅशन स्टोअर्स आहेत. दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून 3 किमी अंतरावर आहेत. येथे स्पा मिळवण्यासाठी अनेक उत्तम पर्याय आहेत.

रोमांचक खडतर प्रवास अनुभवायचा असेल तर एकदा वैष्णोदेवी यात्रा करा! पण..

प्रंबनन मंदिर

प्रंबनन हे इंडोनेशियातील योगाकार्टा येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्माजी यांच्यासाठी 9व्या शतकात बांधले गेले. या मंदिरात निर्माता ब्रह्मा, रक्षक विष्णू आणि संहारक शिव यांच्या मूर्ती स्थापित आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याचा समावेश आहे. हे मंदिर दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे तसेच प्राचीन वास्तुकला दर्शवते.

उल्वातु मंदिर

पुरा मधील उल्वातु मंदिराला भेट देणे देखील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणाऱ्यांसाठी चांगले ठरेल. हे भव्य मंदिर हिंदी महासागराच्या 70 मीटर उंचीवर एका मोठ्या खडबडीत चुनखडीच्या कड्यावर वसलेले आहे. बालीमधील बुकिट द्वीपकल्पावर वसलेले हे मंदिर 11व्या शतकाच्या आसपास बांधले गेलेले दिसते. येथील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अतिशय मनमोहक आहे.

पहिल्यांदा लडाखला फिरायला जाण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

बैतुर रहमान मशीद

इंडोनेशियातील प्रसिद्ध मशिदींमध्ये बैतुर रहमान मशीदचे नाव समाविष्ट आहे. येथील बांदा अके या सुंदर शहराच्या मध्यभागी हे वसलेले आहे. ही मशीद येथील लोकांमधील समृद्धी धर्म आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. या मशिदीला 2004 मध्ये आलेल्या सुनामीचा फटका बसला होता. पण लोकांमध्ये तिचे महत्त्व कमी झालेले नाही. या मशिदीची रचना स्थानिक परंपरा आणि मुघल भारतीय वास्तुकला दर्शवते.

माउंट ब्रोमो

इंडोनेशियाच्या नैसर्गिक पर्यटन आकर्षणाबद्दल बोलायचे झाल्यास, पहिले नाव पूर्व जावा येथे असलेल्या माउंट ब्रोमोचे येते. इंडोनेशियातील अनेक ज्वालामुखी पर्वतांपैकी हे सर्वात लोकप्रिय आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या पांढऱ्या धुरामुळे या पर्वतांचे सौंदर्य आणखील उठून दिसते. ब्रोमो पर्वतावरील सूर्योदयाचे दृश्य अतिशय आल्हाददायक आहे. इंडोनेशियाचा हा ज्वालामुखी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.

आणि बरेच काही

इंडोनेशियाचे मनमोहक हिल स्टेशन उबुद, बालीपासून अवघ्या 35 किमी अंतरावर पर्वतांच्या शिखरावर आहे. हे भाताच्या शेतांनी वेढलेले आहे. केम्पुहान रिज वॉक हा 1 किलोमीटरचा चालण्याचा ट्रॅक आहे, येथून चालताना निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते. इतकेच नाही तर बालीमध्ये खूप कला, संगीत, नृत्य आणि सुंदर मंदिरे आहेत.

मनासारखी खरेदी करा

भारत आणि इंडोनेशियाच्या चलनातील फरक भारतीय पर्यटकांना येथे श्रीमंतीची फिलींग देते. इंडोनेशियाचे चलन देखील रुपया आहे. त्याला इंडोनेशियन रुपया म्हणतात. सध्या 521 भारतीय रुपयांना 1,00,000 इंडोनेशियन रुपये मिळतात. मात्र, येथे फक्त पैसा स्वस्त आहे, बाकी सर्व महाग आहे. याचा अर्थ बालीमध्ये खरेदी करणे तुम्हाला स्वस्त वाटणार नाही. परंतु, इतर परदेशी देशांच्या तुलनेत येथे स्वस्त खरेदी होईल.

राणी लक्ष्मीबाईंचा 'समर पॅलेस'! इथे गुन्हेगारांसाठी होती मृत्यूची विहीर

कसे पोहोचायचे?

दिल्ली ते बाली हवाई अंतर सुमारे 6,800 किमी आहे. विमानाने बालीला पोहोचण्यासाठी सुमारे 8.15 तास लागतात. बालीला थेट विमानसेवा नाही, त्यामुळे बँकॉक किंवा सिंगापूर किंवा क्वालालंपूर मार्गे जावे लागेल

Published by: Rahul Punde
First published: January 3, 2022, 4:12 PM IST

ताज्या बातम्या