जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / रोमांचक खडतर प्रवास अनुभवायचा असेल तर एकदा वैष्णोदेवी यात्रा करा! पण, जाण्यापूर्वी 'हे' वाचा

रोमांचक खडतर प्रवास अनुभवायचा असेल तर एकदा वैष्णोदेवी यात्रा करा! पण, जाण्यापूर्वी 'हे' वाचा

रोमांचक खडतर प्रवास अनुभवायचा असेल तर एकदा वैष्णोदेवी यात्रा करा! पण, जाण्यापूर्वी 'हे' वाचा

माता वैष्णो देवी मंदिराचा (Vaishno Devi temple) प्रवास हा देशातील सर्वात पवित्र आणि कठीण तीर्थक्षेत्रांपैकी एक मानला जातो. याचं कारण म्हणजे मातेचा दरबार जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu Kashmir) त्रिकुटा (Trikuta) डोंगरावरील एका गुहेत आहे, जिथं पोहचायला 13 किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जानेवारी : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) प्रसिद्ध माता वैष्णो देवी मंदिरात (Vaishno Devi Shrine Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जण ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. दरवर्षी याठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येत असतात. अनेकदा गर्दी उसळल्याने अशा घटना घडण्याची स्थिती तयार होते. जर तुम्ही पहिल्यांदा वैष्णो देवी यात्रेला जात असाल तर त्यासंबंधी सर्व माहिती घेऊनच जा म्हणजे तुम्हाला प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये. येथे आम्ही तुम्हाला वैष्णोदेवी यात्रेशी संबंधित सर्व आवश्यक माहिती देणार आहोत. माता वैष्णो देवी मंदिराची यात्रा ही देशातील सर्वात पवित्र आणि कठीण तीर्थक्षेत्रांपैकी एक मानली जाते. याचे कारण म्हणजे मातेचा दरबार जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकुटा (Trikuta) पर्वतावरील एका गुहेत आहे. येथे पोहचण्यासाठी 13 किलोमीटरची पर्वतरांगामध्ये कठीण चढाई करावी लागते. खडतर मार्गावर सर्व सुविधा उपलब्ध हा खडतर प्रवास असूनही दरवर्षी सुमारे 1 कोटी भाविक माता वैष्णोदेवीला भेट देतात. प्रवास पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे हवामान, गर्दी आणि तुमचा वेग यावर अवलंबून आहे. तसे पाहता गेल्या अनेक वर्षात वैष्णोदेवी यात्रेत अनेक सुविधा उभारल्याने प्रवास सुकर झाला आहे. डोंगर कोरुन वाट तयार करण्यात आली आहे. संपूर्ण चढाईच्या संपूर्ण मार्गावर विश्रांतीसाठी शेड, शाकाहारी भोजन, पाणी, सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे. कटरा वैष्णो देवीचा बेस कॅम्प जम्मूमधील कटरा हे छोटे शहर जम्मूपासून 50 किमी अंतरावर असलेल्या वैष्णोदेवीचे बेस कॅम्प आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण नोंदणी स्लिपच्या आधारेच तुम्हाला मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाते. कटरा ते भवन दरम्यान अनेक ठिकाणं आहेत ज्यात बाणगंगा, चरपादुका, इंद्रप्रस्थ, अर्धकुवारी, गर्भजून, हिमकोटी, सांझी छट आणि भैरो मंदिर यांचा समावेश आहे. या प्रवासाचा मध्यबिंदू अर्धकुवारी आहे. येथे मातेचे मंदिर देखील आहे जिथे लोकं थांबून विसावा घेतात अन् देवीचे दर्शन घेतल्यानंतर उर्वरित 6 किलोमीटरचा प्रवास सुरू करतात. मे 2018 रोजी बाणगंगा ते अर्ध कुवारी दरम्यान नवीन रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. जेणेकरून सध्याच्या 6 किमी मार्गावर भाविकांची गर्दी कमी करता येईल. तुम्हालाही sunrise आणि sunset पाहण्याचं वेड असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या वैष्णोदेवीला जाण्याचा योग्य काळ कोणता? वैष्णोदेवीची यात्रा वर्षभर सुरुच असते. पण, उन्हाळ्यात मे ते जून आणि नवरात्रीत (मार्च ते एप्रिल आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर) या कालावधीत भक्तांची मोठी गर्दी असते. याशिवाय पावसाळ्यात जुलै-ऑगस्टमध्ये प्रवास करणेही टाळावे. कारण प्रवासातील निसरड्या मार्गामुळे चढण कठीण होते. याशिवाय डिसेंबर ते जानेवारीपर्यंत येथे प्रचंड थंडी असते. या गोष्टी सोबत न्यायला विसरू नका बेस कॅम्प कटरा समुद्रसपाटीपासून 2 हजार 500 फूट उंचीवर आहे तर वैष्णोदेवीचे मंदिर समुद्रसपाटीपासून 5,200 फूट उंचीवर आहे, त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या तापमानात मोठा फरक आहे. जर तुम्ही पावसाळ्यात प्रवास करत असाल तर रेनकोट किंवा छत्री नक्कीच सोबत घ्या. हिवाळ्यात भरपूर लोकरीचे कपडे, जॅकेट, टोपी आणि हातमोजे बाळगायला विसरू नका. प्रवासादरम्यान वाटेत ब्लँकेटही मिळतात. चढताना आरामदायक शूज घाला. याशिवाय उन्हाळ्यातही हलके उबदार कपडे सोबत ठेवा. कारण उंच गेल्यावर हवामान बदलले तर थंडी जाणवू शकते. राणी लक्ष्मीबाईंचा ‘समर पॅलेस’! इथे गुन्हेगारांसाठी होती मृत्यूची विहीर वैष्णोदेवीला कसं पोहचणार? हवाईमार्गे - जम्मूचे राणीबाग विमानतळ हे वैष्णोदेवीचे सर्वात जवळचे विमानतळ आहे. वैष्णोदेवी बेस कॅम्प कटराला जम्मूपासून रस्त्याने पोहोचता येते, जे सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू आणि कटरा दरम्यान बस आणि टॅक्सी सेवा सहज उपलब्ध आहेत. रेल्वे मार्ग जवळचं रेल्वे स्थानक जम्मू आणि कटरा आहेत. जम्मू हे देशातील प्रमुख शहरांशी रेल्वेने चांगले जोडलेले आहे. याशिवाय वैष्णोदेवीचा बेस कॅम्प कटरा हे देखील रेल्वे स्टेशन आहे. श्री माता वैष्णो देवी कटरा रेल्वे स्टेशन हे जम्मू-उधमपूर रेल्वे मार्गावर स्थित आहे, जे 2014 मध्ये सुरू झाले होते. दिल्लीशिवाय इतर अनेक शहरांतूनही थेट गाड्या येथे येतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ट्रेनने थेट कटरा येथे येऊ शकता आणि त्यानंतर येथून माता दरबारापर्यंत पायी प्रवास करू शकता. आयुष्यात महासागरांचा त्रिवेणी संगम अनुभवायचा असेल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या रोड ट्रीप जम्मू हे देखील देशाच्या विविध भागांशी रस्त्याने जोडलेले आहे आणि जम्मू मार्गे रस्त्याने कटरा येथे पोहोचता येते आणि तेथून त्रिकुट टेकड्यांवर चढता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात