राणी लक्ष्मीबाईंचा 'समर पॅलेस'! इथे गुन्हेगारांसाठी होती मृत्यूची विहीर, हा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

राणी लक्ष्मीबाईंचा 'समर पॅलेस'! इथे गुन्हेगारांसाठी होती मृत्यूची विहीर, हा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

Jhansi Rani Lakshmibai : काळ्या पाण्याची शिक्षा तुम्ही ऐकली असेलच, पण ते विहिरीत टाकण्याची शिक्षा तुम्ही ऐकली नसेल. शहरापासून 18 किमी अंतरावर असाच एक किल्ला आहे ज्यात गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी विहीर खोदण्यात आली होती. बुंदेलखंडच्या प्राचीन इमारती रहस्य, साहस आणि कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहेत.

  • Share this:

झाशी, 31 डिसेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यापासून अनेक शहरं आणि ठिकाणांची नावं बदलली आहे. आता उत्तर प्रदेशातील जुन्या जिल्ह्यांमधील आणखी एक प्रसिद्ध शहर झाशीच्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई असे करण्यात आलं आहे. खरंतर झाशी नाव आपल्या सर्वांनाच खूप प्रचलित आहे. देशात राहणाऱ्या लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच महाराणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाबद्दल माहिती आहे. "मी माझी झाशी देणार नाही (मै मेरी झांसी नहीं दूंगी) हे वाक्यही तुम्ही अनेक वाचलं किंवा ऐकलं असेल. लक्ष्मीबाईंची आठवण म्हणून लोकं त्यांचा झाशीचा किल्ला आवर्जून बघायला जातात. लक्ष्मीबाई झाशीच्या किल्ल्यात राहत होत्या असे शालेय पुस्तकांमध्येही शिकवले जाते. हे खरेही आहे. मात्र, महाराणी लक्ष्मीबाई यांच्याशी निगडीत आणखी काही किल्ले आहेत. ज्याबद्दल फार लोकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका किल्ल्याबद्दल सांगणार आहोत. बरुआ सागर किल्ला असे या किल्ल्याचे नाव आहे.

बरूसागर किल्ल्याचा इतिहास

बुंदेलखंडचे उन्हाळ्यातील अंगाची लाहीलाही करणाऱ्या हवामानाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण बुंदेलखंडचे सौंदर्य पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. विशेषत: झाशीच्या आजूबाजूच्या ठिकाणी पसरलेल्या छोट्या-छोट्या टेकड्या या हंगामात हिरव्यागार झाडांनी व्यापलेल्या असतात. हा किल्ला झाशी-खजुराहो मार्गावर झाशीपासून 22 किमी अंतरावर असलेल्या बरुआसागर शहरातील एका छोट्या टेकडीवर तलावाच्या काठी वसलेला आहे. बुंदेला राजा उदित सिंग याने 18व्या शतकात हा किल्ला बांधला असे मानले जाते.

राणी लक्ष्मीबाईचा 'समर पॅलेस'

पुढे हा किल्ला महाराणी लक्ष्मीबाईंनी 'समर पॅलेस' म्हणून वापरला. किल्ल्यामध्ये मोठ्या भिंतींनी झाकलेला एक मोठा पाच विभागांचा महाल आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या लहान-मोठ्या खोल्या बांधल्या आहेत, ज्यामध्ये राजघराणे आणि त्यांचे अनुयायी राहत असत. झाशीच्या उष्णतेने हैराण झाल्यामुळे लक्ष्मीबाई हिरवाईत थोडा वेळ घालवण्यासाठी येत. उन्हाळ्याच्या दिवसातच राणी या किल्ल्यावर राहायला येत असे येथील लोक सांगतात.

आयुष्यात महासागरांचा त्रिवेणी संगम अनुभवायचा असेल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या

मृत्यूची विहिरी

किल्ल्यात तीन विहिरी बांधण्यात आल्या आहेत, त्यापैकी स्थानिक लोक मोठ्या विहिरीला मृत्यूची विहीर म्हणतात. या विहिरींशी संबंधित कथा अशी आहे की, महाराणी लक्ष्मीबाईंना जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करायची असेल तेव्हा त्या त्याला शिक्षा म्हणून या किल्ल्यावर पाठवत असत. येथे गुन्हेगाराला विहिरीच्या आत अन्नपाणी न देता ठेवलं जात होतं. म्हणून याला मौत का कुआ म्हणजेच मृत्यूची विहीर असं नाव पडलं. या किल्ल्याला लागूनच राजवाड्यासारखा तलाव आहे, जो पाहून नैनितालची आठवण येईल. हा इतका मोठा जलाशय आहे की ज्याची दुसरी बाजू दिसत नाही. अनेक वर्षांच्या दुष्काळात तो कोरडा पडला. टेकडीवरील ही इमारत सुरक्षेसाठी बांधण्यात आली होती. दुरून पाहिल्यावर मनाला भिडणारा किल्ला आहे. गडावरून आजूबाजूचे दृश्यही खूप सुंदर आहे.

राजवाड्याच्या बाजूला एक सुंदर पॅगोडा बांधला आहे. येथे 1744 मध्ये पेशवे आणि बुंदेले यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये माधोजी सिंधियाचे नेते ज्योतिभाऊ मरण पावले. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा किल्ला बुंदेलखंडमधील सर्वात सुरक्षित किल्ल्यांपैकी एक आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

Published by: Rahul Punde
First published: December 31, 2021, 7:10 PM IST

ताज्या बातम्या