First ladakh trip | पहिल्यांदा लडाखला फिरायला जाण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

First ladakh trip | पहिल्यांदा लडाखला फिरायला जाण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

कोरोनाच्या सावटाखाली सर्वांनीच नवीन वर्षात चांगल्या गोष्टी घडण्याची अपेक्षा केली असेल. या वर्षात दूर कुठेतरी फिरायला जायचा संकल्प तुम्ही केला असेल तर तुमच्यासाठी लडाख सर्वोत्तम राहिल. पण, लडाखला तुम्ही पहिल्यांदाच (First ladakh trip) जात असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जानेवारी : लडाख (ladakh) हे भारतातील सर्वात सुंदर पर्यटन (Tourist place) स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक येथे भेट देतात, तरीही येथील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे. लडाख इतकं सुंदर आहे की जो कोणी इथे एकदा भेट देईल तो इथलाच होऊन जाईल. तुम्हाला 3 इडियट्स (Three idiots) चित्रपट आठवतो, ज्याचा शेवटचा सीन लडाखमध्येच शूट झाला होता. या चित्रपटानंतर तर येथे पर्यटकांचे ओढा आणखी वाढला. खुद्द आमिर खानच्या (Aamir Khan) मनातही लडाख विषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे. तो आवर्जून याठिकानी दानधर्म करतो.

लडाख हे दुचाकीस्वारांसाठी स्वर्ग आहे. बॉलीवूड स्टार्सनाही लडाखला जायला आवडते, इतकेच नाही तर अनेक परदेशी लोकही खास लडाखला भेट देण्यासाठी भारतात येतात. जर तुम्ही नवीन वर्षात पहिल्यांदाच लडाखला जाणार (First ladakh trip) असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

लडाखमध्ये हवामान कसे आहे? Ladakh weather

पर्वतांच्या हवामानाबद्दल प्रत्येकाला माहित आहे की ते कधीही बदलू शकते. जर तुम्ही लडाखला भेट देणार असाल तर तुम्ही हिवाळा, उन्हाळा आणि पावसाचा असे ऋतू एकाच दिवसात अनुभवू शकता. तिथे काही मिनिटांतच हवामान बदलते. आता सूर्यप्रकाश असेल तर काही मिनिटांत पाऊस किंवा थंड वारे सुरू होतील. पण या ऋतूत जगण्यातही एक वेगळीच मजा आहे. हाच अनुभव घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे भेट देत असतात. लडाखमध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी दूर जाण्याचा बेत करू नका. एखाद्या ठिकाणी राहून तेथील हवामानाचा अनुभव घेतल्यास तुम्हाला खूप आरामदायी वाटेल.

लडाखमध्ये आहार कसा मिळतो? local food of Ladakh

लडाखच्या स्थानिक खाद्यपदार्थांबद्दल सांगायचे तर, इथला थुकपा आणि बार्लीपासून बनवलेला बिअर चांग खूप प्रसिद्ध आहे. मात्र, आवडलं म्हणून कितीही खावं असं करू नका. लक्षात ठेवा तुम्ही डोंगराळ भागात फिरायला गेला आहात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वकच केली पाहिजे. पण, लडाखला गेलात तर तिथले लोकल फूड एकदा जरूर ट्राय करा.

नो प्लास्टिक झोन No plastic zone

लडाख हा नो प्लास्टिक झोन आहे, येथील वातावरण अतिशय स्वच्छ असून प्रदूषण नगण्य आहे. जर तुम्ही लडाखला भेट देणार असाल तर हे लक्षात ठेवा की हा नो प्लास्टिक झोन आहे, त्यामुळे इथे प्लास्टिक वापरू नका. इथे प्लास्टिकवर बंदी आहे, पण तुमच्याकडे प्लास्टिकची बाटली असेल तर ती फेकून देऊ नका. येथील पर्यावरण केंद्रातून तुम्ही 7 रुपयात पाण्याची बाटली भरून घेऊ शकता. पण, इथे चुकूनही बाटली टाकून देऊ नका. लडाखमध्ये तुम्ही दूर कुठेही फिरायला जात असाल तर काळजी घ्या आणि कचरा तिथे फेकण्याऐवजी सोबत आणा आणि हॉटेलच्या डस्टबिनमध्येच टाका.

लडाखमध्ये कोणते कपडे घालावेत?

लडाखमध्ये हवामान काहीही असो, पण तुम्ही शक्य तितके झाकलेले कपडे घालावे कारण इथल्या लोकांना स्किन शो असलेले कपडे आवडत नाहीत, यामुळे तुम्हालाही अस्वस्थ वाटू शकते. अनवाणी पाय, खांदे, कंबर किंवा शरीराचा कोणताही भाग दिसेल असं करू नका. कारण इथल्या स्थानिक लोकांना ते आवडत नाही. एवढेच नाही तर तुम्ही लडाखमधील कोणत्याही धार्मिक स्थळी जात असाल तर अंगभर कपडे घालूनच जा. इथले लोक नम्र असले तरी त्यांचे मन दुखवू नका. लडाखच्या सहलीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उबदार कपडे. त्यांना सोबत घ्यायला विसरू नका. जाड जाकीट व्यतिरिक्त थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गरम कपडे सोबत ठेवा. याशिवाय लडाखमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि कॅबमध्ये धूम्रपान करणे गुन्हा मानला जातो. म्हणून, जर कोणी तुम्हाला असे करताना पाहिले तर तो तुमच्याबद्दल तक्रार देखील करू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा आणि धूम्रपान करू नका.

पहिल्यांदाच लडाखला जात आहे, त्यामुळे मुक्काम कुठे?

जर तुम्ही लडाखला भेट देणार असाल तर लेह शहरातील चांगस्पा रोडवर राहावे, शहरात राहण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे. इतकेच नाही तर येथे तुम्हाला होम स्टेचा पर्यायही मिळेल जो हॉटेल आणि गेस्ट हाऊसपेक्षा स्वस्त आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार लेह लडाखमध्ये राहण्याची व्यवस्था करू शकता.

तुम्हालाही sunrise आणि sunset पाहण्याचं वेड असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या

जर तुम्ही लडाखला फिरायला जाणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इथे राहणे, खाणे आणि फिरायलाही खूप खर्च येतो, जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही शेअर टॅक्सी करू शकता जी कोणत्याही स्थानिक ठिकाणाहून मिळेल. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायला हवी की टॅक्सी स्टँडवरून उपलब्ध असलेल्या टॅक्सी लांब पल्ल्यापर्यंत जात नाहीत, या टॅक्सी तुम्हाला फक्त जवळच्या लोकलच्या ठिकाणी घेऊन जातात पण फिरण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

Published by: Rahul Punde
First published: January 1, 2022, 4:34 PM IST

ताज्या बातम्या