मराठी बातम्या /बातम्या /travel /

आता फिरायला जाताना बजेटची काळजी करू नका! उलट प्रवास करुन पैसे कमवा

आता फिरायला जाताना बजेटची काळजी करू नका! उलट प्रवास करुन पैसे कमवा

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

अनेकांना प्रवासाची (traveling) आवड असते. मात्र, आर्थिक (Budget) मर्यादेमुळे अनेकांना आपल्या छंदाला मुरड घालावी लागते. पण, फिरुनही तुम्ही पैसे कमावू शकता असं सांगितलं तर? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्यय? तर हे खरच शक्य आहे. आम्ही तुम्हाला अशा काही आयडिया देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही आरामात प्रवास करुन पैसे कमावू (earn money) शकता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 28 डिसेंबर : प्रवासाची (traveling) आवड सर्वांनाच असते, पण आर्थिक मर्यादेमुळे हा छंद पूर्ण करणे सर्वांनाच शक्य होत नाही. साहजिकच जेव्हा प्रवासाची योजना आखली जात असते, तेव्हा सहलीत (trip) खर्च झालेल्या पैशांचे बजेट (Budget) सर्वात आधी तयार केले जाते. कुठे जायचं, कसं जायचं, कुठे राहायचं, कुठे हिंडायचं या सगळ्यासाठी पैशांची गरज असते. याशिवाय सहलीत अचानक कोणते खर्च येऊ शकतात हे आधीच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीत वर्षातून एकदा जरी फिरणं झालं तरी अनेकजण आनंदी होतात. अनेकदा फिरायची इच्छा असूनही प्रत्येकवेळी बजेट आडवं येतं. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या बजेटची मर्यादा तर दूर होईलच पण प्रवास करताना पैसे कमवण्याची संधीही मिळेल. प्रवासी लेखक Travel Writer जर तुमचे लेखन कौशल्य चांगले असेल तर तुमच्याकडे प्रवासी लेखक बनण्याचा एक चांगला पर्याय आहे. सहलीसाठी तुम्ही कोणतेही स्थान निवडत असाल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथल्या खास गोष्टींवर चांगले लेखन करू शकता. अशा अनेक वेबसाइट्स आणि मासिके आहेत ज्या त्यांच्या वेबसाइट किंवा मासिकात असे वास्तविक अनुभव प्रकाशित करतात. तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग देखील सुरू करू शकता. या ब्लॉगमध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रवासातील खास गोष्टी लेखाच्या स्वरूपात लिहू शकता. तुमचं लेखन लोकांना आवडलं तर तुमच्या ब्लॉगवर जाहिराती मिळू शकतात. शिवाय तुम्हीही थेट जाहीरातीसाठी साईटवर जागा देऊ शकता. या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. यासोबतच तुम्ही तुमचे स्वतःचे मासिक किंवा वेबसाइट देखील सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रवासाचा अनुभव शेअर करू शकता. इतरांचे प्रवासाचे अनुभव वाचून लोकांना एखाद्या ठिकाणी भेट देण्यात अधिक आनंद होतो. तुम्हालाही याचा फायदा होईल. तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर जितके जास्त हिट्स मिळतील किंवा तुम्हाला मासिकांची जितकी जास्त विक्री मिळेल, तितक्या जास्त जाहिराती तुम्हाला मिळतील. याद्वारे तुम्ही अधिकाधिक सहलींचे नियोजन करुन पैसेही कमवू शकता. फोटोग्राफी Photography जर तुमच्याकडे चांगला कॅमेरा असेल आणि तुम्हाला फोटो क्लिक करण्याची आवड असेल, तर फोटोग्राफी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देखील देऊ शकते. होय, यासाठी तुम्हाला फोटो अँगल, इफेक्ट आणि चांगले लोकेशन माहित असले पाहिजे. जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल, तर आतापासून तुम्ही तुमच्यासोबत कॅमेरा सोबत घ्या. सहलीदरम्यान चांगली छायाचित्रे घ्या आणि तुम्ही ही चित्रे इमेज वेबसाइटवर विकू शकता. अशा अनेक एजन्सी आहेत ज्या फ्रीलांसर फोटोग्राफर्सना संधी देतात आणि त्यांचे फोटो खरेदी करतात आणि त्यांना चांगली किंमत देतात. आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या क्लिक केलेल्या फोटोंची वेबसाइट देखील तयार करू शकता आणि त्यांची विक्री करू शकता. या फोटोंना 500 ते 50000 रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. सध्या अनेक मोबाईलमध्येही चांगल्या दर्जाचे कॅमेरे आहेत. त्यामुळे तुम्ही मोबाईल फोटोग्राफी करुनही पैसे कमवू शकता. Khajuraho | खजुराहो मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांबद्दल माहिती आहे का? ऑनलाइन स्टोअर्स Online Store जर तुम्हाला प्रवासाचा छंद असेल तर साहजिकच तुम्हाला शॉपिंगची आवड असेल आणि नसेल तर हा छंदही जोपासा कारण या छंदामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेल. मात्र, हे खरंय की तुम्ही शॉपिंग करून पैसे कमवू शकता. पण ही खरेदी तुमची वैयक्तिक नसून या शॉपिंगद्वारे तुम्ही ऑनलाइन स्टोअर सुरू करू शकता आणि प्रवासादरम्यान खरेदी केलेल्या वस्तू त्या स्टोअरमध्ये विकू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या घरी एक छोटेसे दुकान उघडू शकता. त्या दुकानात तुम्ही बाहेरून आणलेल्या वस्तू विकू शकता. यासाठी तुम्ही कुठेही सहलीचे नियोजन करत असाल, तिथून काही चांगले शोपीस खरेदी करा आणि त्या शोपीसची किंमत वाढवून तुमच्या शहरात विका. अनुवादक Translator भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्हाला अनेक परदेशी लोक पर्यटन स्थळी दिसतील. जर तुम्ही एकटे प्रवासी असाल तर तुम्ही या परदेशी प्रवाशांसाठी अनुवादक म्हणून काम करून पैसेही कमवू शकता. तुमचे इंग्रजी उत्तम असायला हवे. तुम्हाला एखादी परदेशी भाषा येत असेल तर सोन्याहून पिवळं. याद्वारे तुम्ही प्रवासासोबतच पैसेही मिळवाल. किंबहुना प्रत्येक पर्यटन स्थळावर तुम्हाला अनेक परदेशी प्रवासी आढळतील ज्यांना हिंदी किंवा स्थानिक भाषा येत नाही. तुम्ही त्यांना यात मदत करून त्यांच्याकडून काही फी घेतली तर त्यात गैर काहीच नाही. Hampi vitthal mandir | हंपी येथील विठ्ठल मंदिराविषयी या 2 आख्यायिका माहिती आहे? यूट्यूबर/ व्‍लॉगर you tuber /v logger सध्या अनेकांना यूट्युबवर व्हिडीओ अपलोड करताना तुम्ही पाहिले असेल. यातून किती पैसे कमावता येतील हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? जर तुमच्याकडे चांगला व्हिडिओ कॅमेरा असेल तर तुम्ही सुद्धा व्लॉगर बनू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या सहलीचे व्हिडिओ बनवावे लागतील आणि ते YouTube वर अपलोड करावे लागतील. व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी तुम्हाला YouTube वर तुमचे स्वतःचे चॅनल तयार करावे लागेल. यानंतर तुम्ही त्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करू शकता. जर तुमच्या चॅनेलला जास्त व्ह्यू मिळू लागले तर तुम्हाला त्यातही जाहिराती मिळू लागतील. या जाहिरातींद्वारे तुम्ही घरी बसून भरपूर पैसे कमवू शकता.
First published:

Tags: Budget, Travel, Travelling

पुढील बातम्या