Mega Block News : रविवारी बाहेर पडण्यापूर्वी वाचा वेळापत्रक, या मार्गावर असणार मेगा ब्लॉक!

Mega Block News : रविवारी बाहेर पडण्यापूर्वी वाचा वेळापत्रक, या मार्गावर असणार मेगा ब्लॉक!

Mega Block News : मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक बदललेलं असतं. मुंबईतील अनेक उपनगरीय लोकल बंद असतात. येत्या रविवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे पाहूया

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : मुंबईकरांना रविवारी बाहेर पडताना मेगा ब्लॉकचं टेन्शन असतं. प्रत्येक रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जातो. अभियांत्रिक कामासाठी घेतल्या जाणाऱ्या या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक बदललेलं असतं. मुंबईतील अनेक उपनगरीय लोकल बंद असतात. येत्या रविवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी मध्य रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकच्या दरम्यान हार्बर मार्गावरील कोणती वाहतूक सुरू आणि बंद असेल ते पाहूया

काय आहे वेळापत्रक?

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत.. ठाणे येथून सकाळी 10.35 ते संध्याकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते संध्याकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Vande Bharat Express : मुंबईतील 'या' स्टेशनवरही थांबणार वंदे भारत एक्स्प्रेस, वाचा नवे वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत बंद असेल.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते संध्याकाळी 4.47 या वेळेत, वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते संध्याकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

'या' मार्गानं करा प्रवास

कुर्ला येथून विशेष लोकल तर प्रवाशांना मेन लाईनवरुन प्रवासाची परवानगी असेल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर मेगाब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

First published: January 21, 2023, 7:51 AM IST

ताज्या बातम्या