आयुष्यात महासागरांचा त्रिवेणी संगम अनुभवायचा असेल तर 'या' ठिकाणाला अवश्य भेट द्या!

आयुष्यात महासागरांचा त्रिवेणी संगम अनुभवायचा असेल तर 'या' ठिकाणाला अवश्य भेट द्या!

तुम्ही महासागरांचा (Ocean) त्रिवेणी संगम (Triveni Sangam) कधी पाहिला आहे का? किती भव्य, अद्भूत आणि सुदर असेल याची कल्पना करा. आयुष्यात एकदा तरी याचा अनुभव घ्यावा अशी ही गोष्ट आहे. यासाठी तुम्हाला आपल्या देशाच्या शेवटचं टोक असलेल्या कन्याकुमारीला भेट द्यावी लागेल.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : नद्यांचा संगम तुम्ही नक्कीच पाहिला असेल. दोन किंवा त्रिवेणी संगम (Triveni Sangam) पाहताना किती भारी वाटतं ना? हिंदू धर्मात (Hindu Religion) तर अशा संगमाच्या ठिकाणांना विशेष महत्व असते. कल्पना करा दोन महासागरांचा संगम किती भव्य, अद्भूत आणि सुंदर दिसत असेल ना? कन्याकुमारी (kanyakumari) हे असेच एक ठिकाण आहे जिथे सुंदर दृश्यांची कमतरता नाही. तामिळनाडूच्या (tamil nadu) दक्षिण किनार्‍यावर वसलेली कन्याकुमारी हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा त्रिवेणी संगम आहे.

भारतातील पर्यटन स्थळांच्या यादीत या ठिकाणाचे वेगळे महत्त्व आहे. दूरवर पसरलेल्या समुद्राच्या अफाट लाटांमध्ये येथील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अतिशय मनमोहक असते. समुद्र किनाऱ्यावर पसरलेली रंगीबेरंगी वाळू त्याच्या सौंदर्यात भर घालते. जर तुम्हीही कन्याकुमारीबद्दल इतकं काही जाणून घेतल्यानंतर तिथे जाण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला तिथल्या काही खास पर्यटन स्थळांची माहिती असलीच पाहिजे, ज्यामुळे तुमची कन्याकुमारीची सहल कायमची आठवणीत राहील.

तिरुवल्लुवर पुतळा Thiruvalluvar Statue

तिरुक्कुरुलची रचना करणारे अमर तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा हा पुतळा पर्यटकांना खूप आकर्षित करतो. 38 फूट उंच चौथाऱ्यावर बांधलेली ही मूर्ती 95 फूट आहे. या पुतळ्याची एकूण उंची 133 फूट असून तिचे वजन 2000 टन आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी एकूण 1283 दगडांचा वापर करण्यात आला होता. तसेच ही मूर्ती तिरुक्कुरलच्या 133 अध्यायांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांची तीन बोटे, म्हणजे अराम, पोरुल आणि इनबाम, नैतिकता, संपत्ती आणि प्रेम या तीन विषयांचा अर्थ दर्शवितात.

पद्मनाभपुरम पॅलेस Padmanabhapuram Palace

पद्मनाभपुरम राजवाड्याच्या विशाल हवेल्या त्रावणकोरच्या राजाने बांधल्या होत्या. या हवेल्या त्यांच्या सौंदर्य आणि भव्यतेसाठी ओळखल्या जातात. कन्याकुमारीपासून त्याचे अंतर 45 किमी आहे. हा राजवाडा केरळ सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे.

अम्मान मंदिर Anman Temple

जर तुम्ही कन्याकुमारीला जात असाल तर तुम्ही अम्मान मंदिराला जरूर भेट द्या. हे मंदिर माता पार्वतीला समर्पित आहे. हे तीन महासागरांच्या संगमावर बांधले गेले आहे. इथे समुद्राच्या लाटांचा आवाज स्वर्गातील संगीतासारखा ऐकू येतो, अशी लोकांची धारणा आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्त मंदिराच्या डावीकडे 500 मीटर अंतरावर असलेल्या त्रिवेणी संगमात स्नान करतात.

मंदिराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार नेहमी बंद ठेवले जाते कारण मंदिरात बसवलेल्या देवीच्या अलंकाराच्या प्रकाशामुळे समुद्रातील जहाजे याला दीपस्तंभ समजून किनाऱ्याकडे वळताना आदळल्याच्या घटना घडल्या आहेत.

आता फिरायला जाताना बजेटची काळजी करू नका! उलट प्रवास करुन पैसे कमवा

नागराज मंदिर Nagraj Temple

कन्याकुमारीपासून 20 किमी अंतरावर असलेले नगरकोलचे नागराज मंदिर नाग देवाला समर्पित आहे. भगवान विष्णू आणि महादेवाची आणखी दोन मंदिरे आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चीनच्या बुद्ध विहाराच्या कारागिरीची आठवण करून देणारे आहे. जर तुम्ही कन्याकुमारीला भेट देण्याचा विचार करत असाल तर या मंदिराचा तुमच्या यादीत समावेश करा.

Khajuraho | खजुराहो मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांबद्दल माहिती आहे का?

कोरटालम धबधबा

कन्याकुमारी आणि आजूबाजूला अनेक सुंदर मंदिरे आहेत तसेच येथे एक अतिशय सुंदर धबधबा आहे. कोराटलम धबधबा 167 मीटर उंच आहे. या झऱ्याच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. हे कन्याकुमारीपासून 137 किमी अंतरावर आहे.

विवेकानंद रॉक मेमोरियल Vivekananda Rock Memorial

समुद्रात बांधलेल्या या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहण्यासाठी विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीने 1970 मध्ये हे पवित्र स्थान बांधले होते. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं.

हे ठिकाण श्रीपाद पराई म्हणूनही ओळखले जाते. या स्मारकाचे विवेकानंद मंडपम आणि श्रीपाद मंडपम असे दोन प्रमुख भाग आहेत. प्राचीन मान्यतेनुसार या ठिकाणी कन्याकुमारीनेही तपश्चर्या केली होती. कुमारी देवीच्या पावलांचे ठसे आजही आहेत असे म्हणतात.

Published by: Rahul Punde
First published: December 29, 2021, 6:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या