तुम्हालाही sunrise आणि sunset पाहण्याचं वेड असेल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या!

तुम्हालाही sunrise आणि sunset पाहण्याचं वेड असेल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या!

कामाच्या तणावातून सुटका करून घेण्यासाठी कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर या 7 ठिकाणांना नक्की भेट द्या. नवर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी यासारखी जागा मिळणार नाही. या ठिकाणीचा सुर्योदय आणि सुर्यास्त तुमच्या कायम स्मरणात राहील असा आहे.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : मानवाने वैज्ञानिक प्रगती करुन सुख-सुविधेच्या असंख्य गोष्टी निर्माण केल्या आहेत. तरीही निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर जे सुख आणि आनंद मिळतो, तो अद्यापतरी त्याला निर्माण करता आलेला नाही. निसर्गाने साकारलेल्या प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे वेगळे सौंदर्य असते. पर्वत, नद्या, धबधबे, झाडे, वनस्पतींपासून ते प्राण्यांपर्यंत सर्व निसर्गाची देणगी आहे. आनंदाचा खरा अनुभव निसर्गाच्या सान्निध्यातच मिळतो यात शंका नाही. कोणत्याही आधुनिक लक्झरी वस्तूमध्ये निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता नाही. निसर्गाच्या असीम सौंदर्याला किंमत नाही. कामाच्या तणावातून सुटका करून घेण्यासाठी कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या. इथला उगवता सूर्य पाहून तुमचा सगळा थकवा निघून जाईल. आम्ही तुमच्यासाठी जगातील 7 सुंदर ठिकाणांची माहिती देत ​​आहोत, जिथे तुमचा सर्व थकवा दूर होईल.

गोवा Goa Beach

जर तुम्ही या उन्हाळ्यात तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी गोवा हे मस्ती करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. गोव्यातील बीच प्रत्येक पर्यटकाचे मन जिंकते. येथे समुद्र, सुंदर किनारे, किल्ले, पब, बाजारपेठांसह असंख्या पाहण्यालायक गोष्टी आहेत. खास म्हणजे समुद्रकिनारी बसून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे दृश्य पाहणे हा क्षण खूपच रोमांचक असतो.

विशेषत: बेटलबटीम बीचवर (Betalbatim Beach) बसून सूर्यास्त पाहणे हे भाग्यवान लोकांच्या नशीबात असते असं म्हणतात. माजोर्डा बीचच्या दक्षिणेला असलेला बेटलबटीम बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सुंदर सूर्यास्तामुळे याला 'सनसेट बीच ऑफ गोवा' असेही म्हणतात. येथील शांतता हे सर्व अधिक खास बनवते.

गोवा

माउंट अबू, राजस्थान mount abu rajasthan

अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव डोंगरी शहर आहे. यासोबतच हे ठिकाण जैन धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सकाळ-संध्याकाळ पर्यटक इथल्या निसर्गरम्य निसर्गाचा आनंद लुटताना दिसतात. इथून आजूबाजूला पसरलेल्या सुंदर निसर्गरम्य दृश्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. येथील सूर्यास्त आणि सूर्योदय खूप प्रसिद्ध आहेत.

माउंट अबू, राजस्थान

ओडिशा Odisha

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला फार दूरचा प्रवास करता येत नसेल तर ओडिशाला जा. इथेही तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर समुद्र किनारे पाहायला मिळतील. याशिवाय येथील सीफूड आणि प्रादेशिक संस्कृती तुमचे मन जिंकेल.

येथेच चिल्का सरोवर आहे, जे भारतातील पहिले आणि जगातील दुसरे सर्वात मोठे सागरी सरोवर आहे. येथील सौंदर्य पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. येथे सुमारे 160 प्रजातींचे पक्षी आढळतात. याशिवाय ओरिसातील भव्य समुद्र किनारा पाहण्याचाही आनंद लुटता येईल. सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी चंद्रभागेचा फेरफटका मारा. येथे तुम्ही उत्तम छायाचित्रण करू शकता.

ओडिशा

ताजमहाल, आग्रा agra taj mahal

आग्रा येथील ताजमहाल पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक जमतात. या अप्रतिम संगमरवरी वास्तूचे आकर्षण असे आहे की, प्रत्येक परदेशी पर्यटकाला भारतात सहलीला आल्यानंतर या स्थळाला भेट द्यायची इच्छा असते. ताजमहालला सकाळी आणि संध्याकाळी कधीही भेट देता येते. पण विश्वास ठेवा, जर तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या प्रकाशकिरणांमध्ये ताजमहाल दिसला तर तुम्ही इथले दृश्य कधीही विसरू शकणार नाही.

लक्षद्वीप Lakshadweep

लक्षद्वीप हे भारतातील फिरण्याच्या ठिकाणांपैकी सर्वोत्तम ठिकाण देखील मानले जाते. लक्षद्वीपचे हवामान वर्षभर आल्हाददायक असते. येथील तापमान साधारणपणे 30 अंशांच्या वर जात नाही, त्यामुळे तुम्ही वर्षभरात कधीही येथे भेट देऊ शकता. मात्र, ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान येथे प्रवास करणे चांगले. येथील वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे.

लक्षद्वीप

दीव Div

चमकणारी वाळू, समुद्राच्या लाटा, दूरच्या क्षितिजाला स्पर्श करणारे निळे आकाश आणि वाऱ्याची हळूवार झुळूक हे सर्व दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला गोव्यात जाण्याची गरज नाही. हे सर्व दृश्य गोव्याजवळील दीवमध्ये पाहायला मिळते. जर तुम्हाला गर्दी आवडत नसेल आणि तुम्हाला निसर्गाच्या कुशीत फिरण्याची आवड असेल, तर दीव तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. या ठिकाणचे सौंदर्य तुमचे मन जिंकेल. येथे तुम्ही उगवता सूर्य आणि मावळता सूर्याचे दर्शन सहजपणे करू शकता.

दीव

पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे येथे आहेत. पण येथील मुख्य आकर्षण म्हणजे 'फोर्ट दीव' जो तीन दिशांनी समुद्राने वेढलेला आहे आणि चौथ्या दिशेने एक छोटा कालवा त्याचे संरक्षण करतो. या दिशेला गडाचे प्रवेशद्वार आहे. हा किल्ला सोळाव्या शतकात गुजरातच्या सुलतान बहादूर शाहने पोर्तुगीजांशी मुघलांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी करार म्हणून बांधला होता. फोर्ट दीव वरून समुद्राचे दृश्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

Khajuraho | खजुराहो मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांबद्दल माहिती आहे का?

केरळ

केरळच्या सौंदर्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे. येथे भरपूर नैसर्गिक दृश्ये आहेत, त्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ काढून येथे भेट द्यावी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसह भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे कधीही भेट देऊ शकता कारण येथील हवामान वर्षभर जवळपास सारखेच असते.

केरळ हे खूप मोठे असले तरी तुम्ही अलेप्पीपासून फिरण्याची सुरुवात करू शकता. ज्याला 'पूर्वेचं व्हेनिस' असेही म्हटले जाते. तुम्ही केरळच्या या शहरातील अंबालापुझा श्रीकृष्ण मंदिर, कृष्णपुरम पॅलेस, मरारी बीच आणि अर्थुंकल चर्चलाही भेट देऊ शकता. त्यानंतर पलक्कडमधील नेल्लियमपथी हिल्सवर जा, जिथे पर्वतांची शिखरे ढगांशी स्पर्धा करताना दिसतात. पर्वत आणि ढगांमध्ये उगवणारा सूर्य पाहून तुम्ही अचंबित व्हाल. त्यानंतर तुम्ही निलांबूर येथे असलेल्या कुंडू धबधब्यावर जाऊ शकता. त्याचे सौंदर्य आणि थंड पाणी तुमच्या सुट्टीची मजा वाढवेल.

Published by: Rahul Punde
First published: December 30, 2021, 4:57 PM IST

ताज्या बातम्या