मुंबई, 18 जून : नवनवीन ठिकाणी फिरायला जायची अनेकांना आवड असते. नवीन ठिकाणी जाऊन तेथील आगळ्यावेगळ्या गोष्टी पाहणे, निसर्गाचा मनमुराद आनंद घेणं, तेथील संस्कृती समजून घेणं हे सारंच मजेशीर असते. विविध ठिकाणांना भेट देताना आपण तिकीट बुकिंग, सोबत न्यावयाचे साहित्य, जेवण, तेथील हवामानात फिरण्यायोग्य कपडे इतर कागदपत्रे इत्यादी गोष्टींची काळजी घेतो, मात्र त्या ठिकाणांना भेट देताना राहण्यासाठी हॉटेल बुक (Hotel Booking) करताना मात्र आपण कमालीचे बेफिकीर राहतो. अनेक लोक तिथं जाऊन एखादं हॉटेल बुक करू किंवा प्रवासादरम्यानच आपल्याला बजेटमध्ये (Budget) हॉटेल मिळेल, असा विचार करतात. असे केल्याने आपला वेळ वाचतो, पण तुम्हाला योग्य हॉटेल मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा हॉटेलमध्ये जाऊन आपल्याला फसवणूक झाल्यासारखे वाटते. म्हणूनच हॉटेल बुक (Hotel Booking Tips) करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. 1. हॉटेल्समधील रुम बुक करण्याची योग्य वेळ - आपल्याला असे वाटते की, शेवटच्या क्षणी बुकिंग केल्यामुळे आपल्याला चांगली डील मिळेल आणि आपले पैसे वाचतील. परंतु असं काही नाही. हा आपला गैरसमज आहे. सकाळच्या वेळी हॉटेल्स खूप महाग असतात, त्यामुळे त्रास होऊ नये म्हणून शक्यतो अॅडव्हान्स बुकिंग करावं. हेही वाचा- पुन्हा कोरोना वाढतोय! लागण होऊ नये म्हणून आयुष मंत्रालयाच्या या टिप्स करा फॉलो 2. बेडशीट आणि उशा बदलून घ्या - बऱ्याचदा हॉटेलमधील बेडशीट्स, उशा इत्यादी गोष्टी अस्वच्छ असतात. बऱ्याचदा बेडशीट कितीही स्वच्छ दिसतात, परंतु तरी ती तुमच्यासमोर बदलून घ्या. कारण हॉटेलचे कर्मचारी प्रत्येक ग्राहकांसाठी ते बदलत नाहीत. सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या धोक्यादरम्यान आपण स्वच्छता आणि सुरक्षिततेची अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण स्वच्छ बेडशीट आणि उशांसाठी हॉटेलमध्ये आग्रह धरा. 3. डॉयरेक्ट बुकिंगऐवजी अॅपने बुक करा - बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल की हॉटेलच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग केलंत तर तुम्हाला हॉटेल खूप महाग वाचतं. परंतु तुम्ही काही हॉटेल बुकिंग अॅप्सच्या (Booking Apps) माध्यमातून हॉटेल बुकिंग केल्यास आपले पैसे वाचतात. याशिवाय तुम्हाला अनेक कूपन कोड किंवा डिस्काउंटही उपलब्ध होतात. हेही वाचा- सुखी आयुष्यासाठी खिशात किती पैसे गरजेचे? ही किंमत तुम्हालाही पटेल! 4. हॉटेलच्या कोप-यातील खोल्या- तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हॉटेलच्या कोपऱ्याच्या बाजूच्या खूप मोठ्या खोल्या असतात, हे बहुतेकांना माहीत नसतं. त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत ट्रिपला (Family Trip) गेला असाल किंवा कोणतीही जास्त रक्कम न मोजता बजेटमध्ये मोठी खोली हवी असेल तर कोप-याकडील बाजूची रूम निवडू शकता. 5. हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्था- एखाद्या ट्रिपदरम्यान तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये थांबता, तेव्हा तुम्ही तेथील सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत सजग असणं खूप महत्ताचं आहे. तुम्ही सुरक्षेचा विचार सर्वप्रथम करावा. एखादी इतर गोष्ट कमी असेल तरी चालेल, परंतु सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये. हॉटेलमध्ये राहताना तेथील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे, सुरक्षा रक्षक इत्यादी गोष्टींची माहिती घ्यावी. तसेच ज्या रुममध्ये तुम्ही थांबणार आहात त्या रुमच्या टॉयलेटमध्ये एखादा कॅमेरा तर लपवलेला नाही ना, याची खात्री करायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.