मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सुखी आयुष्यासाठी खिशात किती पैसे गरजेचे? ही किंमत तुम्हालाही पटेल!

सुखी आयुष्यासाठी खिशात किती पैसे गरजेचे? ही किंमत तुम्हालाही पटेल!

सध्याचं जग पैशाच्या जोरावर मार्गक्रमण करतंय. जगण्यासाठीच्या प्रत्येक गोष्टीमागे पैशाचं कारण आहे. पैशांशिवाय काहीही शक्य नाही. हे खरं असलं, तरी आदर्श जीवन जगण्यासाठी किती पैसा गाठीशी असावा (How Much Money Required For Balanced Life), याबाबत खूप मतभिन्नता आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 18 जून : सध्याचं जग पैशाच्या जोरावर मार्गक्रमण करतंय. जगण्यासाठीच्या प्रत्येक गोष्टीमागे पैशाचं कारण आहे. पैशांशिवाय काहीही शक्य नाही. हे खरं असलं, तरी आदर्श जीवन जगण्यासाठी किती पैसा गाठीशी असावा (How Much Money Required For Balanced Life), याबाबत खूप मतभिन्नता आहे. माणसाची अतृप्त इच्छा ही प्रत्यक्षात वरवर असणाऱ्या अपेक्षा व इच्छांपेक्षा वेगळी असू शकते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात त्याबाबत खुलासा झाला आहे. सगळ्या गरजा पूर्ण करून आदर्श जीवन जगण्यासाठी किती पैसा लागेल, असं त्यात लोकांना विचारण्यात आलं. त्यातल्या निष्कर्षात अनेकांनी खूप वेगवेगळी मतं मांडली. या अभ्यासादरम्यान अमेरिकेतल्या लोकांना प्रश्न विचारण्यात आला, की लॉटरी लागली, तर किती पैसे मिळावेत असं वाटतं. तेव्हा 46 टक्के जणांनी सांगितलं, की 10 मिलियन डॉलर्स किंवा त्यापेक्षा कमी पैशातही आम्ही सुखी राहू शकतो. भारत, अर्जेंटिना आणि रशियामधल्या 50 टक्के जणांनी दहा लाख डॉलर्स (1 Million Dollar) किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 70 ते 80 लाख रुपयेही सुखी राहण्यासाठी पुरेसे असल्याचं मत मांडलं. यूकेमध्ये 26 टक्के नागरिकांनी दहा लाख डॉलर्समध्ये सुखी राहू असं सांगितलं. यातल्या अनेकांनी एक कोटी डॉलर किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा चालेल असं म्हटलं, तर 13 टक्के जणांनी सुखी राहण्यासाठी 100 बिलियन अर्थात दहा हजार कोटी डॉलर्सची गरज असल्याचं सांगितलं. हा अभ्यास 33 देशांमध्ये करण्यात आला. त्यातल्या बहुतेक जणांनी एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैशात आदर्श जीवन जगू शकतो असं म्हटलंय; मात्र काही जणांना जगण्यासाठी भरपूर पैसे हवेत, असं वाटत होतं. सगळ्या देशांमध्ये मिळून 8 ते 39 टक्के व्यक्तींच्या इच्छा अमर्याद असल्याचं आढळलं. त्यांना अधिकाधिक पैसे कमावण्याची इच्छा होती. सहा बेटं व 42 समूहांत पसरलेल्या 33 देशांमध्ये हा अभ्यास झाला. नेचर सस्टेनॅबिलिटी जर्नलमध्ये (Nature Sustainability) त्याचा अहवाल प्रकाशित झाला. नागरिकांच्या अमर्याद इच्छांना सार्वभौम म्हणता येणार नाही, प्रत्यक्षात त्या अल्पसंख्याक वर्गाच्या इच्छा आहेत, असा निष्कर्ष यात काढण्यात आला. काही जणांना अब्जावधी रुपये हवेत, तरी काहींना काही लाखही पुरेसे आहेत. या अभ्यासात अशी अनेक निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. या गळ्यातून एक गोष्ट निश्चित झाली, की जगण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो, याची जाणीव समाजाला होते आहे. त्यामुळे आदर्श जीवन जगण्यासाठी बहुतांश जणांची अपेक्षा माफक पैसा कमावण्याची आहे. हा चांगला विचार समाजात आणखी खोलवर रुजला पाहिजे.
First published:

पुढील बातम्या